Santosh Deshmukh पोलिसांचा पाठलाग चुकवून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी पळाले

Santosh Deshmukh पोलिसांचा पाठलाग चुकवून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी पळाले

Santosh Deshmukh

विशेष प्रतिनिधी

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांचे पहिल्याच दिवशीचे अपयश एका सीसीटीव्ही फुटेजमुळे समोर आले आहे. संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर आरोपी ज्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून पळून जात होते, त्या गाडीचा पोलिस पाठलाग करत असतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. पोलिसांचा पाळलाग चुकवून आरोपी पळाल्याचे यातून दिसत आहे. Santosh Deshmukh

संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख म्हणाले, ‘जंगल परिसरात पोलिस रेकी करत असते, तर आरोपी वाशीच्या जंगलातून बाहेर गेले नसते. सगळे आरोपी वाशीच्या हद्दीमध्ये गाडी सोडून पळाले. आरोपींना पकडण्यासाठी पोलिस त्यांच्यामागावर होते, त्या पोलिसांना कमीतकमी हे माहिती असायला हवं होतं की, कुठलं जंगल आहे, त्या जंगलातून बाहेर पडण्याचे कोणते मार्ग आहेत. त्या रस्त्यावर पोलिस यंत्रणा असती, प्रत्येक जागेवर एका पोलिसाला जरी रेकी करायला ठेवले असते. तर आरोपी वाशीच्या जंगलातून बाहेर गेले नसते,पण दुर्देव आहे, पोलिसांच्या समोर आरोपी पळून गेलेत.

जप्त करण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज ९ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७. १० चे आहे. याच दिवशी सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास संतोष देशमुख यांची अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सगळे आरोपी धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथून पळून गेले होते. त्यावेळी वाशी येथील पारा चौकातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे स्कॉर्पिओ गाडीत एकूण ६ आरोपी होते. केज पोलिस त्यांचा पाठलाग करत होते. त्यांनी वाशी चौकात नाकाबंदीही केली होती. मात्र पोलिस पाठलाग करत असल्याची माहिती मिळताच आरोपी गाडी सोडून पळून गेले होते.

The accused in the Santosh Deshmukh murder case escaped the police chase

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023