विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Raut : अजित पवारांची ही स्टाईल नसून मग्रुरी आहे. मराठवाड्याचं दुःख त्यांना कळलं नाही. फडणवीस यांनी देखील राजकारण करू नको असे सुनावलं होतं. आम्हालाही असे प्रश्न विचारले. आम्ही मात्र अशी उत्तर दिली नाहीत, असा हल्लाबाेल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राऊत यांना आजच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले, ‘अजित पवार तुम्ही गोट्या खेळण्याच्याचं लायकीचेच आहात. तुम्ही भ्रष्ट राज्यकर्ते आहात. ठाण्याचे उपमुख्यमंत्री स्वतःचे फोटो छापून मदत करत आहेत. पंजाबचं उदाहरण पाहा. भगवंत मान यांनी तब्येत बरी नसताना देखील काम केल.केंद्राकडून निधी मिळत नव्हता, तरीदेखील त्यांनी पंजाबमध्ये हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
प्रधानंत्री सहायता योजना म्हणजे पीएम केअर फंड नावाचा एक प्रकार नरेंद्र मोदींनी त्यांच्या कारकिर्दीत सुरू केला.
जेव्हा नैसर्गिक संकट, वैद्यकीय संकट, आपत्ती येईल, अशा वेळेला या फंडातून मोठ्या प्रमाणात मदत करता येईल म्हणून प्रधानमंत्री कार्यालयातचा वापर करुन पीएम केअर फंडाची स्थापना करण्यात आली. हा पीएम केअर फंड सरकारी आहे की खासगी हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, पण त्याच्यातील जी रक्कम आहे ती देशाच्या बजेटपेक्षा मोठी असावी असं लोकांचं म्हणणं आहे. त्या पीएम केअर फंडात मुंबईसारख्या शहरातून सव्वा दोन लाख कोटी रुपये जमा झाले. त्यामुळे पीएम केअर फंडातून, त्या पैशांचा वापर करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं अशी मागणी राऊत यांनी केली.
This is not style, but Ajit Pawar’s arrogance, Sanjay Raut’s attack
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!