विशेष प्रतिनिधी
बीड : Another demand for reservation : राज्यातील विविध समाजाकडून आरक्षणाच्या मागण्या काही थांबताना दिसत नाहीत. एकापाठोपाठ एक सर्वजण आरक्षणाचा अट्टाहास धरताना दिसत आहेत. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असतानाच इतर समाजाकडूनही आरक्षणाच्या मागण्यांना बळ देण्यात येत आहे. आता वंजारी समाजाने देखील एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली आहे.
राज्यात सध्या रक्षणाच्या मागण्यांचे सत्र सुरू आहे. राज्यातील प्रत्येक समाज हा आरक्षणाची मागणी करतो की काय असे चित्र निर्माण झाले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा शासन आदेश काढल्यानंतर ओबीसी समाजात नाराजी निर्माण झाली. मराठा आंदोलन शांत झाल्यानंतर आता ओबीसी समाजाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यातच भर म्हणून बंजारा समाजानेही हैदराबाद गॅजेटच्या आधारे एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली आहे. धनगर समाजाला ही एसटी मधून आरक्षण देण्याची मागणी आहे. या मागणीत आता आणखी एक भर पडली आहे. बंजारा आणि धनगर समाजाच्या पाठोपाठ आता वंजारी समाजाने देखील एसटी मधून आरक्षणाची मागणी केली आहे.
जय भगवान महासंघाचे बाळासाहेब सानप यांनी वंजारा समाजाच्या वतीने ही मागणी केली. ते म्हणाले, ” मराठा समाजाला आरक्षण मिळत असेल तर आम्हालाही एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळालेच पाहिजे.” मराठा समाज आमचा मोठा भाऊ आहे आणि त्यांना मिळत असेल तर आम्हाला देखील आरक्षण मिळालेच पाहिजे असे सानप यांनी स्पष्ट केले आहे. आता या मागणीमुळे आरक्षणाच्या मागणीत आणखीन भर पडली आहे. त्यामुळे आरक्षणाचा मुद्द्यावरून राज्यात पुन्हा वातावरण तापण्याची शक्यता बळावली आहे. वंजारा समाजातील नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आता या मागणीचा अधिक प्रबळपणे पाठपुरावा करतील असेही यावेळी सांगण्यात आले.
राज्यात सध्या वंजारा समाजाला NT – D प्रवर्गातून आरक्षण दिले जाते. तर धनगर समाजाला NT – C आणि बंजारा समाजाला VJ NT प्रवर्गअंतर्गत आरक्षण दिले जाते. N T आणि हे VJ NT या दोन्ही प्रवर्गांना ओबीसी प्रवर्गात चे आरक्षण मिळते. परंतु सध्या बंजारा आणि वंजारी समाजाने ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. धनगर समाजाला ही ST प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी जुनीच मागणी आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देणारा शासनादेश काढल्यानंतर या मागण्या जोर धरताना दिसत आहेत.
या विविध आरक्षणाच्या मागण्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये पुन्हा आंदोलने आणि मोर्चे निघण्याची शक्यता आहे. धनगर वंजारी यांनी बंजारा या तिन्ही समाजांनी आपल्याला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिले नाही तर आंदोलने करण्याचा आणि रस्त्यावर उतरण्याचा इशारा सरकारला दिला आहे. मराठा समाजाला ओबीसी समाविष्ट केले तर आपणही मुंबईत जाऊन आंदोलन करू असे ओबीसी महासंघाने आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे या सगळ्या समाजांच्या आरक्षणाच्या मागण्यांची पूर्तता करता करता सरकारच्या नाकी नऊ येण्याची शक्यता आहे.
इतर कोणत्या समाजाला जर एसटी मधून आरक्षण दिले तर आपण सरकारमधून बाहेर पडू असा इशारा शिंदे गटाचे आमदार अमशा पाडवी यांनी दिला आहे. काही दिवसापूर्वी एसटी प्रवर्गाच्या आरक्षणातील घुसखोरी थांबवण्यासाठी सर्वपक्षीय एसटी आमदारांनी बैठक घेतली होती. या सगळ्या आरक्षणाच्या मागण्यांवर सरकार काय निर्णय घेते हे पहावे लागेल.
This one wants ‘this’, that one wants ‘that’! Another demand for reservation
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा