थ्री इडियट म्हणून पत्रकार परिषद घेणारी माकडं आज कुठे गेली? नितेश राणे यांचा खोचक सवाल

थ्री इडियट म्हणून पत्रकार परिषद घेणारी माकडं आज कुठे गेली? नितेश राणे यांचा खोचक सवाल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळविला आहे. यावरून मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी राहुल गांधी, संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. थ्री इडियट म्हणून पत्रकार परिषद घेणारी माकडं आज कुठे गेली? असा सवाल त्यांनी केला आहे.

लोकसभा विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे व शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यासह काल संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींबाबत सविस्तर आकडेवारी देऊन तीन महत्त्वाचे प्रश्न निवडणूक आयोगाला केले होते. त्यावर बोलताना राणे म्हणाले, दिल्लीचा निकाल पाहता आम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करत असून, दिल्लीच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावार विश्वास ठेवला आहे .

हरियाणा, महाराष्ट्र आणि आता दिल्लीतील विजय यामुळे मोदींच्या विश्वासावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं आहे

काल थ्री इडियट म्हणून पत्रकार परिषद घेणारी माकडं आज कुठे गेली? राहुल गांधी यांचा पक्ष एक आणि दोन वरच आहे. ही त्यांची लायकी. ही त्यांची राजकीय क्षमता आणि बोलतात मोदींवर, बोट ठेवतात.. लोकांची मन जिंकायची नाही तर ज्या ईव्हीएमवर स्वतः निवडून आले त्यावर बोंबलत बसायचं. दिल्लीच्या जनतेचे भाजप कार्यकर्ता म्हणून मी आभार मानेन

संजय राऊत यांच्या काळ्या जादूच्या आरोपावर ते म्हणाले, सर्वात मोठा बंगाली बुवा हा मातोश्रीवर बसतो. ठाकरेंच्या काळ्या जादूच्या कहाण्या जर मी महाराष्ट्राला सांगत बसलो तर लोक त्यांना घरातही घेणार नाहीत. उद्धव ठाकरे वर्षाच्या बंगल्यावर राहायला गेले तेव्हा मागच्या जागेत लॉन मध्ये काय काय पुरलेलं त्याची माहिती महाराष्ट्राला द्यावी लागेल.

काळा जादू करणारा कोण आहे, कुठल्या बुवाकडे हे जातात, काय काय करतात, कसे लिंबू लोकांच्या घराच्या बाहेर टाकतात, याची माहिती माझ्याकडे आहे. संजय राऊत यांनी अजून आपल्या मालकाचे वस्त्रहरण करू नये

केजरीवाल यांना दिल्लीत पाच वर्ष काम करू दिलं नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती यावर बोलताना शेंबड्या मुलांवर मी बोलत नाही , असा टोला त्यांनी लगावला.

Three Idiots go today? Nitesh Rane’s question

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023