विशेष प्रतिनिधि
पुणे : आगामी पुणे महानगरपालिका (पीएमसी) निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर मोठ्या प्रमाणात हरकतींचा वर्षाव होत आहे. आज हरकती नोंदविण्याचा शेवटचा दिवस असल्याने, आजच्या दिवसभरातही अनेक हरकतींची नोंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Pune draft ward structure
निवडणूक आयोगाने पुणे महापालिकेसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली आहे. त्यामध्ये एकूण ४१ विभाग असून १६५ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. प्रभागरचना अंतिम करण्यासाठीच्या वेळापत्रकानुसार २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या दरम्यान प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना नोंदविण्यासाठी मुदत दिलेली आहे. यात सोमवारी ५९५ हरकतींची नोंद करण्यात आली आहे, तर मंगळवारी हा आकडा ९९९ वर गेला.
राजकीय पक्षांनी या नवीन आराखड्याला तीव्र विरोध केला आहे. विरोधी पक्षातील नेते तसेच सत्ताधारी आघाडीतील भागीदार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचा दावा आहे की ही रचना केवळ भाजपला फायदा पोहोचवण्याच्या दृष्टीने केलेली आहे. नागरिकांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे, कारण हे वॉर्ड भौगोलिकदृष्ट्या बरेच मोठे आहेत. यासोबतच त्यांनी प्रादेशिक कार्यालये हलवणे आणि काही वॉर्डांची नावे बदलणे यासारख्या बदलांची मागणी केली आहे. Pune draft ward structure
आक्षेप नोंदवण्यासाठी केवळ आजचा दिवस राहिला आहे. राजकीय पक्ष त्यांच्या समर्थकांना एकत्र करत असल्याने आक्षेपांची संख्या झपाट्याने वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे हरकतींचा आकडा तीन हजारांपेक्षाही जास्त जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने ५ ते १२ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या या आक्षेपांवरील सुनावणीचे निरीक्षण करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांची नियुक्ती केली आहे.
मंगळवारी दिवसभरात ९९९ हरकती-सूचना महापालिकेला प्राप्त झालेल्या आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक तीन विमाननगर लोहगाव येथून २५०, प्रभाग क्रमांक २४ कमला नेहरू रुग्णालय-रास्ता पेठ येथून २१९, प्रभाग क्रमांक ३४ नऱ्हे – वडगाव बुद्रूक येथून २४२ हरकती व सूचना नोंदविल्या गेल्या आहेत तर, निवडणूक कार्यालयाकडे एकूण ३४४ हरकती व सूचना आलेल्या आहेत. Pune draft ward structure
प्रारूप प्रभागरचनेवर दाखल हरकतींची जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी सुरू
जिल्ह्यातील १४ नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतींच्या प्रारूप प्रभागरचनेवर दाखल झालेल्या हरकती व सूचनांवर जिल्हा प्रशासनाने सुनावणीची प्रक्रिया सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत तब्बल २५० हरकतींवर सुनावणी घेण्यात आली.
हरकतींमध्ये मुख्यतः नैसर्गिक सीमांचा विचार न करणे, वस्ती एकसंध न ठेवणे असे मुद्दे पुढे आले आहेत. नगरपरिषदांसाठी ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान तर नगरपंचायतींसाठी १५ सप्टेंबरपर्यंत प्रभागरचनेचे प्रस्ताव तयार करून नगरविकास विभागाकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविले जाणार आहेत. त्यानंतर २६ ते ३० सप्टेंबरदरम्यान अंतिम प्रभागरचना अधिसूचनेद्वारे जाहीर करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. Pune draft ward structure
Today is the last day for objections to the Pune draft ward structure.
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा