विशेष प्रतिनिधी
मुंबई : पहलगाममध्ये हल्ला झाला, त्याचे रक्त अजून सुकलेले नाही. नीरज चोप्राला अंधभक्तांनी देशद्रोही ठरवले होते, मग आता पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना का खेळत आहात? यांना देशापेक्षा व्यापार महत्त्वाचा वाटतो. देशभक्तीचा हा व्यापार सुरू आहे. देशभक्तीची ही थट्टा आहे. व्यापारापुढे त्यांना देशाची देखील काय किंमत राहिलेली अशी उद्विग्न प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. Uddhav Thackeray
आशिया कप 2025 मध्ये होत असलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ‘हर घर से सिंदूर’ आंदोलन राबवणार आहेत. पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, “देशभक्तीचा हा व्यापार सुरू आहे. देशभक्तीची ही थट्टा आहे. व्यापारापुढे त्यांना देशाची देखील काय किंमत राहिलेली नाही. मला राजनाथ सिंह आणि अमित शहा यांना विचारायचे आहे की तुम्ही हे युद्ध संपले आहे असे जाहीर करणार का? हे अंधभक्त सोफिया कुरेशी यांना पाकिस्तानची बहीण म्हणाले होते. आपली पाकिस्तानविरूद्धची भूमिका काय हे स्पष्ट केले पाहिजे, ते म्हणाले होते रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. आता एखाद्या खेळावरती बहिष्कार टाकला तर असे कोणते मोठे संकट ओढवणार नाही. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद थांबवत नाही तोपर्यंत आपण पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवणार नाही, असे ठणकावून सांगितले पाहिजे.
Sharad Pawar : शरद पवारांचा ‘तो’ जीआर मराठ्यांसाठी ठरतोय अडचणीचा !
“ऑपरेशन सिंदूरवेळी भालाफेकपटू नीरज चोप्रावर टीका करण्यात आली होती. त्यांना देशद्रोही म्हणण्यापर्यंत मजल गेली होती. त्यानं पाकिस्तानी प्रशिक्षक, खेळाडूंना भारतात आमंत्रित केलं होतं. त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. आता बीसीसीआय पाकिस्तानसोबत सामना खेळत आहे. आता नेमकं काय बदललं आहे हे पाकिस्तानसोबत आपण युद्ध पुकारलं होतं. मात्र आता त्यांच्यासोबत क्रिकेट खेळतो आहोत.” असा हल्लाबोल केला.
“आज एका उद्विग्न भावनेतून आणि विषन्न मनाने मी तुमच्याशी बोलत आहे. उद्या अबूधाबीत भारत-पाक क्रिकेट सामना आहे. अजूनही पहलगाम हल्ल्यात बळी गेलेल्या भारतीयांचे रक्त सुकले नाहीत. त्यांचे घाव भरले नाहीत. त्यानंतर भारतीयांना वाटले होते की, आपण आता पाकला जागेवर ठेवणार नाही. त्याचे दोन-तीन तुकडे करून टाकू. त्या दृष्टीने एक चढाई आणि युद्धही केले गेले. त्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव ठेवण्यात आले. मधल्या काळात आपल्या संरक्षणमंत्र्यांनी हे ऑपरेशन अजूनही सुरू असल्याचे सांगितले. एकूणच ते जे काही वातावरण होते, ते आपल्यासाठी नव्हते. कारण, काही दिवसांनी किंवा वर्षांनी पाक आपल्या देशात अतिरेकी हल्ले करतो. त्यावेळी आपण सर्वजण जागे होतो. सरकारही चवताळून उठतो.” असे म्हणत उद्धव ठाकरेंनी टीका केली. त्यांनी ऑपरेशन सिंदूर अजून सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
Trade in patriotism, mockery of patriotism: Uddhav Thackeray’s agitated reaction
महत्वाच्या बातम्या
- Yogesh Kadam : ठाकरे बंधुंचे मराठी मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरणार ; योगेश कदम
- round of 11th admission : अकरावी प्रवेशाची विशेष फेरी, चार महिन्यांनंतरही संपेना प्रवेश प्रक्रिया
- ward structure in Pune : पुण्यातील प्रभाग रचनेवर विरोधक व नागरिकांचा रोष !
- Manoj Jarange : ओबीसी समाजाला मिळाले दुष्ट विचारांचा नेता, मनोज जरांगे यांचा हल्लाबोल