विशेष प्रतिनिधी
मुंबई : Lalbaug आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपती विसर्जनाची जोरदार तयारी चालू आहे. मात्र अशातच मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या प्रवेश द्वाराजवळ एका २ वर्षीय चिमूरडीचा गाडीखाली आल्याने मृत्यू झाला आहे. Lalbaug
लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या मिरवणूकी दरम्यान एका अज्ञात वाहनाने दोन चिमूकल्यांना चिरडले. यात एका २ वर्षीय बलिकेचा मृत्यू झाला आहे तर एक ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. परळ येथील केईएम रुग्णालयात या मुलावर उपचार सुरू आहेत.
शनिवारी (ता.६) पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. लालबाग राजच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या विरुद्ध बाजूस, चंद्रा वजणदार (वय वर्ष २) आणि तिचा भाऊ शैलू वजणदार (वय वर्ष ११) ही दोघं भावंडं झोपली होती. त्याचवेळी एक अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले. चालकाने कोणत्याही प्रकारची मदत न करताच घटनास्थळावरून पळ काढला. Lalbaug
याप्रकरणी, काळाचौकी पोलीस ठाण्यात संबंधित चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
नेमकं काय घडलं?
शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास ही घटना घडली. ही दोघं मुलं रस्त्याच्या कडेला झोपलेली असतांना, भरधाव वेगाने येणाऱ्या वाहन चालकाने थेट या मुलांच्या अंगावर गाडी घातली. त्यानंतर, कोणत्याही प्रकारची मदत न करता त्या चालकाने तिथून पळ काढला. Lalbaug
लालबाग राजाच्या मिरवणुकीची तयारी सुरू असल्याने तिथे प्रचंड गर्दी होती. या गर्दीतून अनेक लोकांनी पुढे येऊन या दोन चिमुकल्यांना केईएम रुग्णालयात दाखल केले. सध्या या मुलावर उपचार सुरू आहेत.
पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मात्र, वाहनचालकाविषयी अद्यापही काही ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही. Lalbaug
Two-year-old child dies after being crushed by vehicle near Lalbaug entrance
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा