मुख्यमंत्र्यांचा मनाचा मोठेपणा, उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या सार्वजनिक न्यास अध्यक्षपदी नियुक्ती

मुख्यमंत्र्यांचा मनाचा मोठेपणा, उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या सार्वजनिक न्यास अध्यक्षपदी नियुक्ती

Uddhav Thackeray

विशेष प्रतिनिधी

मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सतत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टीमने मारतात त्यांच्यावर वैयक्तिक हल्लेही करतात. मात्र तरीही मनाचा मोठेपणा दाखवून मुख्यमंत्र्यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या सार्वजनिक न्यासाच्या अध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविली आहे. राज्य सरकारने शासननिर्णय काढत ही नियुक्ती अधिकृत केली. Uddhav Thackeray

या निर्णयानुसार, उद्धव ठाकरे, माजी मंत्री सुभाष देसाई आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांची पाच वर्षांसाठी ट्रस्टी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.याचबरोबर शिशिर शिंदे आणि पराग आळवणे यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी ट्रस्टमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.



न्यासात पदसिद्ध सदस्य म्हणून महाराष्ट्र शासनाचे सचिव, प्रधान सचिव तसेच मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांनाही स्थान देण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीत उभारण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय स्मारकाची कामे वेगात सुरू असून, नव्या नियुक्त्यांमुळे प्रकल्पाला अधिक दिशा आणि गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील वर्षभरात बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक जनतेसाठी खुलं होणार असल्याची शक्यता आहे. Uddhav Thackeray

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यास (Balasaheb Thackeray National Memorial Trust) हा एक अधिकृत न्यास आहे, जो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची उभारणी, देखभाल आणि व्यवस्थापन करण्यासाठी स्थापन करण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ स्मारक बांधणे आणि जपणे, त्यांचे जीवनकार्य, विचार, भाषणे आणि राजकीय प्रवास जतन करण्यासाठी विशेष स्मारक तयार करणे, स्मारकाचे व्यवस्थापन व निधीचे नियोजन,स्मारकाच्या देखभालीसाठी निधी उभारणे, त्याचा पारदर्शक वापर करणे बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याची माहिती पुस्तके, डिजिटल संग्रहालय, छायाचित्रे, भाषणे, व्हिडिओ इत्यादी स्वरूपात जतन करणे. स्मारकात सांस्कृतिक आणि जनजागृती उपक्रम राबवणे. प्रदर्शने, कार्यक्रम, ऐतिहासिक उपक्रम, जागरूकता मोहिमा आयोजित करणे, ही न्यासाचे काम आहे. Uddhav Thackeray

सहे स्मारक मुंबईतील शिवाजी पार्क, दादर येथे उभारले जात आहे, कारण शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचा या ठिकाणाशी भावनिक आणि ऐतिहासिक संबंध आहे.

http://youtube.com/post/UgkxKTCuT9GgvtbDy8eZvoJQrF8IuBBnGFy0?si=sdKjD2AwxjRN-g0d

Uddhav Thackeray Reappointed to Lead Balasaheb Thackeray Memorial Trust

महत्वाच्या बातम्या

 

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023