विशेष प्रतिनिधी
नागपूर : Arun Gawli अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची 18 वर्षांनंतर नागपूर तुरुंगातून सुटका झाली आहे, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर केल्यानंतर बुधवारी त्यांची सुटका झाली आहे. गवळीला शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. Arun Gawli
गेल्या १८ वर्षांपासून तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. आता जामिनावर सुटका झाल्यानंतर गवळीच्या भविष्याच्या हालचालींकडे सर्वांचे लक्ष वेधले जात आहे. अरुण गवळी हा केवळ अंडरवर्ल्डपुरता मर्यादित नसून, त्यांनी राजकारणातही पाऊल टाकले होते. त्यामुळे त्यांच्या सुटकेनंतर मुंबईच्या राजकीय व गुन्हेगारी वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. गवळीच्या पुढील कृतींवर आणि हालचालींवर राज्यातील सुरक्षा यंत्रणांचे बारकाईने लक्ष असेल. पोलिसांनी सुरक्षा कारणास्तव गवळी यांची सुटका थेट मागच्या गेटने केली. त्यामुळे मीडियाला चकवा देत त्यांना बाहेर काढण्यात आले.
मुंबईतील घाटकोपर येथे २००७ साली शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची त्यांच्या राहत्या घरी भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली होती. या थरारक हत्याकांडामुळे संपूर्ण मुंबई हादरली होती आणि याच प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली होती. गेल्या १८ वर्षांपासून गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. अनेक वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अखेर त्याला जामीन मंजूर केला. या निर्णयामुळे त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला असून समर्थकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी त्यासंदर्भातील अटी आणि शर्ती निश्चित करण्याची जबाबदारी मुंबई सत्र न्यायालयावर सोपवण्यात आली होती. या न्यायालयाने ठरवलेल्या अटी-शर्ती औपचारिकरित्या नोंदवल्यानंतरच गवळीच्या मार्गातला शेवटचा कायदेशीर अडसर दूर झाला. मुंबई सत्र न्यायालयातून आलेल्या जामिनासंदर्भातील आदेशाची प्रत नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनाला मिळाल्यावर औपचारिक कार्यवाही पूर्ण करण्यात आली. त्यानंतर अखेर आज अरुण गवळीची सुटका करण्यात आली.
Underworld Don Arun Gawli released from Nagpur jail after 18 years
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांनी आम्हाला ज्ञान शिकवू नये, राधाकृष्ण विखे पाटील यांचा टोला
- शरद पवार भेटीला पोचणार म्हटल्याबरोबर मनोज जरांगे ताठ; उर्मट भाषेत फडणवीसांच्या पाठोपाठ राज ठाकरेंवर निशाणा!!
- मनोज जरांगे प्रमाणिक, पण त्याचा वापर, रोहित पवारांकडून रसद, नितेश राणे यांचा आरोप
- स्वतःचं पोरगं निवडणुकीत पाडलं, कधीपर्यंत भाजपची री ओढणार? मनाेज जरांगे यांचा राज ठाकरेंना सवाल