Uttam Jankar : पक्षाच्या शिबिराला उत्तम जानकर यांची दांडी; अनुपस्थितीचे कारणही अस्पष्ट

Uttam Jankar : पक्षाच्या शिबिराला उत्तम जानकर यांची दांडी; अनुपस्थितीचे कारणही अस्पष्ट

Uttam Jankar

विशेष प्रतिनिधी

नाशिक:  Uttam Jankar :  आज नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे एकदिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले आहे. उद्या सरकारचे धोरण आणि शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिराला पक्षातील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र, काही नेत्यांनी कारणे देत आपली अनुपस्थिती नोंदवली, तर सोलापूरमधील माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी कोणतेही कारण न देता शिबिराला दांडी मारली.

नाशिक येथे आयोजित राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मेळाव्याला पक्षातील जवळपास सर्व आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या शिबिरात पक्षाचे प्रमुख शरद पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांच्यासह राज्यभरातील अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंतु, या पार्श्वभूमीवर पक्षातील पाच आमदार आणि दोन खासदार शिबिराला अनुपस्थित असल्याचे दिसून आले. काही वेळानंतर नारायण आबा पाटील आणि अभिजीत पाटील उशिराने दाखल झाले. त्यामुळे तीन आमदार आणि दोन खासदार यांनी शिबिराला अनुपस्थिती दर्शवल्याचे समोर आले.



राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिबिराला खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुरेश म्हात्रे हे दोन खासदार अनुपस्थित होते. तसेच, आमदार राजू खरे, आमदार रोहित पाटील आणि आमदार उत्तम जानकर हे देखील उपस्थित नव्हते. खासदार अमोल कोल्हे यांनी तब्येतीच्या कारणामुळे शिबिराला येणार नसल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना दिले आहे. तर दुसरे खासदार सुरेश म्हात्रे हे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिवा पाटील यांचे नाव देण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी असल्यामुळे अनुपस्थित होते. याची माहिती त्यांनी आधीच प्रदेशाध्यक्षांना दिली होती. आमदार रोहित पवार यांच्या घरात दुखद घटना घडल्याने ते शिबिराला उपस्थित राहू शकले नाहीत. आमदार राजू खरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे तेही अनुपस्थित होते. या सर्वांनी आपल्या अनुपस्थितीचे कारण आधीच पक्षाच्या वरिष्ठांना स्पष्ट केले आहे. मात्र, यामध्ये आमदार उत्तम जानकर यांची अनुपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. त्यांनी आपल्या अनुपस्थितीचे कोणतेही कारण स्पष्ट केलेले नाही.

उत्तम जानकर यांची शिंदे यांच्यासोबतची जवळीक

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर हे मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळ गेले असल्याचे दिसत आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरला दर्शनासाठी गेलेल्या एकनाथ शिंदे यांच्या स्वागताला उत्तम जानकर उपस्थित होते. त्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना उत्तम जानकर यांनी एकनाथ शिंदे यांचे “दानशूर” म्हणून कौतुक केले होते. गणपतीच्या निमित्ताने आपल्या मूळ गावी गेलेल्या शिंदे यांना भेटण्यासाठी उत्तम जानकर त्यांच्या घरी गेले होते. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड तासभर चर्चा झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. आता पक्षातील सर्व नेते उपस्थित असलेल्या या मेळाव्यात उत्तम जानकर यांची अनुपस्थिती चर्चांना बळ देणारी ठरत आहे.

उत्तम जानकर यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या पक्ष बदलण्याच्या आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. जर उत्तम जानकर यांनी एकनाथ शिंदे यांची साथ निवडली, तर त्यांना प्रथम आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे सध्या तरी असे काही होण्याची शक्यता कमी आहे. आमदार निधी मिळत नसल्यामुळे सोलापूरमधील इतर आमदारांना हाताशी धरून सत्ताधारी पक्षासोबत जाण्याची मागणी जानकर यांनी यापूर्वी केल्याचे बोलले जाते.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘देवा भाऊ’ या जाहिरातीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने ‘देवा तूच सांग ना’ या जाहिरातींद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. ‘देवा तूच सांग ना’ या आशयाच्या जाहिराती नाशिकमधील अनेक वर्तमानपत्रांमध्ये छापल्या गेल्या आहेत. या मेळाव्याला राज्यभरातील विविध पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत. खुद्द शरद पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

Uttam Jankar’s presence at the party camp; Reason for absence unclear

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023