विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी : Vaibhav Naik कोकणात ऑपरेशन टायगर गतिमान करून उद्धव ठाकरे सेनेला आणखी धक्का देण्याची तयारी शिंदे गट करत आहे. माजी आमदार राजन साळवीनंतर भास्कर जाधव, वैभव नाईक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा मंत्री भरत गोगावलेंनी केला आहे. मात्र आम्ही गद्दारी करणार नाही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही प्रामाणिक राहू, अशी स्पष्ट ग्वाही माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.Vaibhav Naik
नाईक म्हणाले, शिवसेना फुटीच्या वेळेला सुद्धा आम्हाला ऑफर होत्या. आम्ही त्या ऑफर नाकारल्या आहेत. आमचे जरी नुकसान झालं असलं तरी आम्हाला त्याचा अभिमान आहे. आता ऑफर आलेल्या नाहीत. मात्र आल्या तरी नाकारू. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये काही लोकांनी गद्दारी केली होती. शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही हीच शपथ घेतो की, आम्ही गद्दारी करणार नाही .
लातूर प्रतिबंधक विभागाकडून सुरू असलेल्या चौकशीबाबत नाईक म्हणाले मी एकटा आहे. मी त्यांच्याकडे गेलो नाही म्हणून माझी चौकशी सुरू राहणार. माझा लढा एकट्याचा आहे. गद्दारी स्वार्थासाठी न करता मातीशी इमान राखलं पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याचे काम निकृष्ट झालं होतं. दुर्दैवाने हा पुतळा पडला. आता नवीन स्मारक होते ते चांगलं व्हावं. मजबूत व्हावं आणि या स्मारकात कुठलाही भ्रष्टाचार होऊ नये. या स्मारकासाठी आमचं देखील सहकार्य असेल. हे स्मारक अत्यंत चांगलं व्हावं अशी आमची अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी भाजप सोबत युती का केली नव्हती, हे आता एकनाथ शिंदे यांना कळलं असेल. सर्वच निर्णय मुख्यमंत्री घेत आहेत. फडणवीस कोणालाही विश्वासात घेत नाहीयेत. शिंदे गटाची सिक्युरिटी का काढली हे विचारावं, असा आरोप नाईक यांनी केला.