विशेष प्रतिनिधी
मुंबई : Pakistan काल झालेल्या क्रिकेटच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा चांगलाच पराभव केला आहे. परंतु विरोधी पक्षनेत्यांनी मात्र हा देशद्रोह असल्याचा सुर लावून धरला आहे. आज भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यावरून विरोधकांना चांगलेच सुनावले आहे.
क्रिकेट हा भारतीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यातही भारत विरुद्ध पाकिस्तान म्हटल की एक वेगळाच उत्साह असतो. यावेळी मात्र बहुतांश भारतीयांच्या मनात याविषयी आक्रोश दिसून आला. Pakistan
भारताने कालच्या सामन्यात पाकिस्तानला दिवसा तारे दाखवून दिले. मात्र तरी देखील भरतीयांमध्ये हवा तसा उत्साह दिसत नाहीये. कारण पहलगाम मधील शहीदांचा आक्रोश अजूनही भारतीयांच्या चांगलाच लक्षात आहे. मात्र हा सामना खेळण्यावरून विरोधी पक्षाने सरकारला गेल्या काही दिवसांपासून वेठीस धरले होते. ऑपरेशन सिंदूरवर शंका घेणाऱ्या विरोधकांनी थेट सिंदूर आंदोलनही केलं.
इतकंच नाही तर हा सामना खेळवणे म्हणजे एकप्रकरचा देशद्रोहच आहे, असा आरोप देखील खासदार संजय राऊत यांनी सरकारवर केला होता. मात्र आता भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी त्यांच्यावर चांगलाच पलटवार केला आहे. काल भारताला पाकिस्तान विरुद्ध मिळालेला विजय हीच खरी पहलगाम हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच त्यांनी राहुल गांधी यांच्यासारखे नेते म्हणजे कागदी वाघ असल्याचाही आरोप त्यांनी केला. Pakistan
नेमकं काय म्हटले केशव उपाध्ये?
‘ही खरी पहलगाम हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली!
काल पाकिस्तानला किक्रेटच्या मैदानात सर्व बाजूने चारी मुंड्या चीत करून विजयी होत पाकिस्तान खेळाडूंची दखलही न घेता भारतीय संघ पुढे निघून गेला. ही खरी पहलगाम शहिदांना वाहिलेली श्रध्दांजली होती. हेच खरे अस्सल वाघ..
पहलगामच्या दुर्दैवी घटनेनंतरही परदेशातील पर्यटनात रमलेले उध्दव ठाकरे, किंवा पाकिस्तानची भाषा बोलणारे राहूल गांधी यांच्यासारखे भारतीय नेते म्हणजे तर कागदी वाघ! सतत पराभवाची कारणे शोधायची यांची सवय. ना यांना लढायचं माहिती ना विजयाची भाषा यांना कधी कळली!सैन्याने ॲापरेशन सिंदूर यशस्वी करीत पाकिस्तानला धडा शिकवलाच पण आता क्रिकेटच्या मैदानावरही भारतीय संघाने हेच सिद्ध केले!!
यह नया भारत है… यह लडनेसे डरता नही है.. लडता है, और जीतता भी है…’ अशी पोस्ट करत केशव उपाध्ये यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. Pakistan
Victory over Pakistan is the true tribute to the martyrs of Pahalgam; Keshav Upadhyay
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा