विशेष प्रतिनिधी
बीड : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर उद्या केज न्यायालयात सुनावणी होणार असल्याचे कराडचे वकील अशोक कवडे यांनी सांगितले. खंडणीच्या गुन्ह्यात गोवले गेले असल्याचे आमचे म्हणणे असल्याचे ते म्हणाले.
कवडे म्हणाले, 14 तारखेला वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आम्ही त्याच दिवशी जामीनीसाठी अर्ज केला होता. यावर सरकारी पक्ष आणि तपासी अधिकारी यांचे उत्तर न्यायालयाने मागवले होते. आता याची सुनावणी उद्या होणार आहे.
काल प्रकृती खराब असल्यामुळे मी न्यायालयात हजर राहू शकलो नाही. त्यामुळे सुनावणी उद्या होणार आहे या गुन्ह्याशी माझा काही संबंध नाही असे पक्षकार वाल्मीक कराड यांचे म्हणणे आहे .
खंडणीच्या गुन्ह्यात गोवले गेले असेही ते म्हणाले आहेत. प्रकरण दाखल करायला झालेला उशीर हे दर्शवितो त्यांना या प्रकरणात गुंतवले गेले आहे. खंडणी मागितली आणि खंडणी दिली, खंडणी घेतली यातील खंडणी मागितली किंवा दिली यातील कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याचे दिसून येतो.आमच्या बाजू बघून न्यायालयाने आम्हाला जामीन द्यावा ही मागणी आम्ही उद्या न्यायालयात करणार आहोत. आमच्या पक्षकाराचा न्यायालयावर विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर, धनंजय मुंडे यांना मोठा धक्का, अजित पवार पुण्यासह बीडचे पालकमंत्री
कराडवर असलेल्या गुन्ह्याच्या ज्या बातम्या प्रकाशित झाल्या त्यानंतर पक्षकाराने संबंधित तपासी अधिकारी यांच्याकडे यादी दिली आहे. यात त्यांच्यावर 14 गुन्हे दाखल होते. यापैकी 11 ते 12 गुन्ह्यातून ते दोष मुक्त झाले आहेत बाकीचे गुन्हे राजकीय आंदोलनातील संदर्भातले आहेत. कराडचे अमेरिकेशी संबंध आहेत का नाही? याबाबत न्यायालयासमोर कुठलाही भाग आलेला नाही. तपासी अधिकारी योग्य ते खुलासा करू शकतील, असे कवडे यांनी सांगितले
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड हाच मास्टरमाईंड असल्याचे म्हटले जात होते. आका म्हणून कराडवर आरोप होत होते. पण सीआयडी तपासातून वाल्मीक कराड नव्हे सुदर्शन घुले हा मास्टरमाईंड असल्याचे म्हटले आहे. आश्चर्य म्हणजे घुले गँग लीडर तर कराड त्याच्या टोळीचा सदस्य असे दाखविले आहे.
9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांनी ही हत्या केल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. सुदर्शन घुले याने पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली होती. यात संतोष देशमुखांनी हस्तक्षेप केला होता. यातूनच सुदर्शन घुलेसह इतर आरोपींनी संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांचा जीव घेतला.
या हत्येत सुदर्शन घुलेचा प्रत्यक्ष सहभाग असला तरी या गुन्ह्यामुळे वाल्मीक कराडच खरा मास्टरमाइंड असल्याचा आरोप सुरुवातीपासून होत आहे. वाल्मीक कराडला अटक करावी, यासाठी राज्यभरात मोठमोठी आंदोलनं देखील झाली. वाल्मीक कराडला अटक करून त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणाचा खरा सूत्रधार वाल्मीक कराड हाच असल्याचा आरोप सुरुवातीपासून होत आहे.
मात्र, सीआयडीने संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले याला गँगचा लीडर दाखवलं आहे, तर वाल्मीक कराड हा सुदर्शन घुलेच्या गँगचा सदस्य असल्याचं म्हटलं आहे. सीआयडीच्या या खुलाशानंतर वाल्मीक कराड नव्हे तर सुदर्शन घुले हाच खरा मास्टरमाइंड असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असू शकतो, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने तपास केला जात आहे.
walmik Karad’s bail application will be heard in court tomorrow
महत्वाच्या बातम्या
- शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
- कुणाशी जरी लागेबांधे असले तरी आरोपीला सोडणार नाही, एकनाथ शिंदे यांची ग्वाही
- प्रजासत्ताकदिनी काँग्रेसची ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅली
- सर्वोच्च न्यायालयात निर्णय झाला तर तीन-चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मुख्यमंत्र्यांची माहिती