Uday Samant : आम्ही देखील स्वबळाची तयारी ठेवू, उदय सामंत यांचा इशारा

Uday Samant : आम्ही देखील स्वबळाची तयारी ठेवू, उदय सामंत यांचा इशारा

Uday Samant

विशेष प्रतिनिधी

नांदेड : Uday Samant  महायुतीत लढायचं आमचं धोरण आहे, पण स्थानिक लेव्हलला काही लोकांना वाटत असेल की ते स्वबळावर लढणार आहेत तर आम्ही देखील स्वबळाची तयारी ठेवू, असा इशारा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.Uday Samant

भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये स्वबळाचा नारा दिला आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत चव्हाणांनी दिले आहेत. यावर उत्तर देताना उदय सामंत यांनीही स्वबळावर लढण्याची तयारी असल्याची घोषणा केली आहे.



शिवसेना शिंदे गटात अनेक जण प्रवेश करीत आहेत. यावरसामंत म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य झालेआहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालणारी आहे आणि ती एकनाथ शिंदे चालवतात यावर शिक्का मोर्तब झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी जो उठाव केलाय त्यामागचं महत्त्वाचं कारण होतं बाळासाहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं काँग्रेसमय शिवसेना होऊ देणार नाही. काँग्रेस बरोबर जाऊ नये ही आमची सगळ्यांची भूमिका होती काँग्रेसने आमचा धनुष्य बाण काढून घेतला होता. बाळासाहेब ठाकरे यांचा धनुष्य बाण पुन्हा आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी उठाव केला. त्यामुळे कोणाला पक्षात आणण्यासाठी मिशनची आवश्यकता नाही. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षात ज्या पद्धतीने काम केलं, जनसामान्यात रुजले, शिवसेना एकनाथ शिंदे चालवतात हे युबीटीच्या सगळ्यांना कळलं. त्यामुळे काही लोक एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारत आहेत.

ते म्हणाले, महाविकास आघाडीला मूर्त घोषित करण्याचे बाकी असल्याचे भाजपचे मंत्री आशिष शेलार म्हणाले आहेत. शेलार यांनी वस्तुस्थिती सांगितली आहे, ठाकरे गटमधले अनेक लोक एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारत आहेत. महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकारी महायुतीमध्ये येत आहेत. याचाच अर्थ विकास आघाडीवर कोणाचाही विश्वास राहिला नाही. महाविकास आघाडीची ताकद भविष्यात 25 वर्ष वाढू शकत नाही हे कार्यकर्त्यांना कळून चुकलय.

सामंत म्हणाले ,शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा दिल्ली सत्कार केला त्यानंतर काही लोकांच्या पोटात पोटशूळ उठला आहे. पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केलं ते काही लोकांच्या जिव्हारी लागलं आहे. प्रतापराव जाधव यांच्याकडे जेवणाच्या कार्यक्रमाला काही खासदार उपस्थित राहिले म्हणून काही लोकांना दुःख झालं. ठाकरे शिवसेनेच्या खासदारांनी भविष्यात शिंदे यांच्याकडे किंवा शिंदे यांच्या सहकार्याकडे जेवायला जायचं असेल आदेश पाळला पाहिजे असं सांगितलं जातं. मला आता एवढं वाटतं आमच्याकडे जेवायला येताना परवानगी घ्यावी, अशा पद्धतीचे काल आदेश झाले आहेत भविष्यात सकाळी नाष्टा काय करावा, दुपारी काय करावा,रात्री काय जेवण करावं याची देखील आदेश यूबीटीच्या खासदारांना होऊ शकतात, असा टोलाही त्यांनी यावेळी मारला.

We will also prepare for fight alone, warns Uday Samant

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023