विशेष प्रतिनिधी
पुणे : Mosque in Manchar नगरपंचायतीच्या वतीने सुरू असलेल्या एका कामादरम्यान पुणे जिल्ह्यातील मंचर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी मशिदीच्या दुरुस्तीचे काम सुरू असतांना हा प्रकार घडला. Mosque in Manchar
नेमकं प्रकरण काय?
आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात चावडी चौकातील दर्ग्याचे बांधकाम सुरू असतांना तेथील भिंत अचानक कोसळली. या घटनेनंतर आतमध्ये भुयार आणि हिंदू स्थापत्य शैली असणारी कमान दिसून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. यादरम्यान इथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने एसआरपीएफच्या दोन तुकड्या तसेच २०० पोलीस तैनात केले आहेत.
Sharad Pawar : शरद पवारांचा ‘तो’ जीआर मराठ्यांसाठी ठरतोय अडचणीचा !
हिंदू संघटनांकडून चौकशीची मागणी !
या घटनेनंतर हिंदू संघटनांकडून या भुयाराचा तपास करून सत्य समोर आणण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुरातत्व विभागाकडून चौकशी करून सत्य समोर आणावे अशी मागणी त्यांनी केली आहे. तर दुसरीकडे, मुस्लिम संघटनांनी मशिदीच्या झालेल्या नुकसानीबाबत नाराजी व्यक्त केली असून हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. तसेच हा केवळ दर्गा आणि कबर असल्याचं देखील मुस्लिम संघटनांनी स्पष्ट केलं आहे. यात दोघ बाजूंनी परस्परविरोधी भूमिका घेतल्याने परिस्थिति अधिक नाजुक झाली आहे. Mosque in Manchar
घटनास्थळी एसआरपीएफच्या दोन तुकड्या तैनात
घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामिणचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही समुदायातील लोकांशी चर्चा करून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. याबाबत बोलतांना चोपडे म्हटले की, आम्हाला माहिती मिळाल्या नंतर तातडीने आमचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याठिकाणी आता मोठा पोलीस बंदोबस्त आहे. घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे.
काल रात्री देखील आम्ही दोन्ही समुदायातील लोकांना शांततेचे आवाहन केले आहे. तसेच, मंचर शहरातील लोकांनी देखील आमच्या आवाहानाला प्रतिसाद देत शहरात शांतता ठेवली आहे, असे देखील चोपडे यावेळी म्हणाले.
याबाबत माहिती देतांना आंबेगावचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे म्हणाले की, दर्गाच्या दुरुस्तीचे काम मंचर नगरपंचायतच्या वतीने सुरू आहे. दुरुस्तीचे काम सुरू असतांना या वास्तूचा पुढील भाग कोसळला, तिथे एक भुयाळ आढळून आले. Mosque in Manchar
पुरातत्व विभाग लवकरच करणार पाहणी
या घटनेनंतर मंचर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केल्याने आता परिस्थिति नियंत्रणात आहे. पुरातत्व विभाग लवकरच या प्रकरणाची पहाणी करणार आहे. या पहाणीनंतर नेमकं त्या भुयाराच स्वरूप लक्षात येईल.
या पहाणीनंतर काय निकल लागतो आणि त्याचे काय परिणाम होतील याकडे सध्या मंचर शहरातील लोकांचे लक्ष लागून आहे. Mosque in Manchar
What exactly is hidden under the Mosque in Manchar?
महत्वाच्या बातम्या
- Yogesh Kadam : ठाकरे बंधुंचे मराठी मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरणार ; योगेश कदम
- round of 11th admission : अकरावी प्रवेशाची विशेष फेरी, चार महिन्यांनंतरही संपेना प्रवेश प्रक्रिया
- ward structure in Pune : पुण्यातील प्रभाग रचनेवर विरोधक व नागरिकांचा रोष !
- Manoj Jarange : ओबीसी समाजाला मिळाले दुष्ट विचारांचा नेता, मनोज जरांगे यांचा हल्लाबोल