विशेष प्रतिनिधी
जालना : Suresh Dhas तुम्हाला भेटायला जाण्याइतकी का माया फुटली, ते काय कोमामध्ये आहेत का? इतक्या क्रूर माणसाला भेटायला जाता तर मग गोरगरीब मराठ्यांनी कोणाकडे न्याय मागायचा? देशमुख कुटुंब उन्हात पडलं आहे, तुम्ही झोपेत आहात का? असा संतप्त सवाल करत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आमदार सुरेश धस यांना जाब विचारला आहे.Suresh Dhas
सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. सुरेश धस यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. मुंडे आजारी असल्याने आपण भेटायला गेलो असे त्यांनी सांगितले.
यावर संताप व्यक्त करताना मनोज जरांगे म्हणाले, ते भेटायला गेले असतील यावर माझा विश्वासच बसत नाही आणि गेले असतील तर हे दुर्दैव आहे. त्यांच्या इतका विश्वासघातकी या पृथ्वीतलावर कोणी जन्मू शकत नाही. ज्या लोकांनी टीका केली, ज्या लोकांनी यांची राजकीय कारकीर्द बरबाद करायचं असं ठरवलं, असं तेच म्हणाले. यांनी तिथंच भेटायला जाणं… आपली माणसं मारून टाकणार्याचं का तोंड बघायचं? इतक्या क्रूर माणसाला तुम्ही भेटायला जाता, ज्याच्या लोकांनी खून घडवून आणला, त्यांना एकदाही देशमुख कुटुंबाकडे यावं नाही वाटलं? तुम्हाला भेटायला जाण्याइतकी का माया फुटली, ते काय कोमामध्ये आहेत का? इतक्या क्रूर माणसाला भेटायला जाता तर मग गोरगरीब मराठ्यांनी कोणाकडे न्याय मागायचा?
देशमुख कुटुंब उन्हात पडलं आहे, तुम्ही झोपेत आहात का? तुमच्या राजकारणासाठी, एखाद्या पदासाठी, तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही इकडे तिकडे फिरता. नाहीतर मग यामध्ये यायचं नाही… इकडं समाजाकडून वाहवा करून घ्यायला पाहिजे, समाजाचा हात पाठीवर पाहिजे… आणि राजकारण पण करायचं… कोणतं तरी एकच काहीतरी करावं … इथं बाकिचे नाहीत का? मोठेपण घ्यायची, सन्मान घ्यायची हाव तर खूप आहे, मग शेवट होईपर्यंत मान तुटेपर्यंत लढायचं देखील, असेही मनोज जरांगे यांनी यावेळी सुनावले .
त्यांनी माणसं कापून टाकली आहेत, त्यांना भेटायला जाता? मराठ्यांनी तुमच्यावर विश्वास टाकला. गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या तोंडात माती कालवता का? काळीज कापून नेणारा हा पहिलाच पृथ्वीतलावरील माणूस असू शकतो. ज्यांनी क्रूर हत्या केली, देशमुखांचं कुटुंब उघड्यावरती पाडलं, त्या क्रूरकर्म्याला भेटायला जातात म्हणजे हे प्रकरण शंभर टक्के षडयंत्रामध्ये गुंतलं आहे. यांना आरोपी सोडून द्यायचे आहेत. चार्जशीट फोडायचं आहे. हे प्रकरण यांना पूर्ण दाबून टाकायचं आहे, असेही मनोज जरांगे म्हणाले.
“जसं खून करणार्यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यापेक्षा सामूहिक कट रचून जो घडवून आणतो तो दोषी असतो ना, तसं एकही आरोपी सुटला तर सकारपेक्षा जास्त धस दोषी राहणार आहेत. जे फडणवीस यांनी केलं नाही ते धस यांनी केलं. या सरकारला मराठ्यांचा तिरस्कार आहे. यांना फक्त मराठ्यांच्याच हाताने मराठ्यांवर वार करायचे होते. जर सुरेश धस भेटले असतील तर शंभर टक्के गोरगरीब मराठ्यांच्या काळजावर त्यांनी वार केला आहे, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.
Why did love burst out to visit, are they in a coma? Jarange asked Suresh Dhas angrily about Munde’s visit
महत्वाच्या बातम्या
- Nilesh Rane : उद्धव ठाकरे यांची पक्ष सांभाळायची कुवत नाही, निलेश राणे यांची टीका
- ”पंतप्रधान मोदींना पराभूत करण्यासाठी अमेरिकेने रचला होता कट”
- Rupali Chakankar : रूपाली चाकणकर यांच्या विरोधात अश्लील पोस्ट करणारे दोघे गजाआड
- Sharad Pawar : शरद पवारांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावला, एकनाथ शिंदेंच्या सत्कारामुळे भडकले संजय राऊत