विशेष प्रतिनिधी
नाशिक : Chhagan Bhujbal जे काही करायचे ते नाशिकमध्ये. इथे माझं घर असताना मी दुसरीकडे का जाऊ, असा सवाल करत नाशिकच्या पालकमंत्री पदावरून छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. Chhagan Bhujbal
अन्न व नागरी पुरवठा मंत्री असलेले छगन भुजबळ यांनी गोंदियामध्ये झेंडावंदन करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नकार दिला होता. आज त्यांनी नाशिकमध्येच झेंडावदन केले. यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी धुळ्याला जाण्यास सांगितले होते, तेव्हा मी नकार दिला होता. झेंडावंदन करणं महत्त्वाचं आहे. आज मी पाहिलं की एका झोपडीवर तिरंगा झेंडा फडकत होता. तिथेही झेंडावंदन झाले. त्यामुळे झेंडावंदन करणं महत्त्वाचं आहे. ते कुठं केलं याला महत्त्व नाही. मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की गोंदियाला जा, मात्र मी त्यांना नकार दिला. कारण एक दिवस आधी तिथं जा, मुक्काम करा आणि परत या. त्यामुळे मी नकार दिला. याआधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी मला धुळ्याचं पालकमंत्री पद देऊ केलं होतं. धुळ्याला जायला सांगितले होते. तेव्हाही मी नाही म्हटलं. इथं (नाशिक) माझं घर असताना मी दुसरीकडे का जाऊ Chhagan Bhujbal
छगन भुजबळ म्हणाले की, आपल्याला स्वातंत्र मिळाले. ते ब्रिटिश सरकार पासून मिळवायचे होते असे नाही, तर गरिबीसाठी पण मिळवणं गरजेच होतं. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पण सुराज्य मिळण बाकी आहे. किंबहुना काही विशिष्ट लोकांना स्वातंत्र्य मिळालं अस म्हणावं. शेवटचा मनुष्य सुखी होईल तेव्हा खऱ्याअर्थने स्वातंत्र्य मिळालं अस म्हणता येईल.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आवाहन करताना भुजबळ म्हणाले की, आता निवडणुका आहे. महानगर पालिका, जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. पक्ष किती मोठा याची मोजणी पक्षाने किती ग्राम पंचायत आणि जिल्हा परिषदांवर विजय मिळवला यावर होणार असते. राष्ट्रवादी एकत्र असताना आपण सर्वात जास्त जागा जिंकत होतो, ह्या नवीन परिस्थितीत आपल्याला आव्हान स्विकारावे लागणार आहे. आपले कार्यकर्ते किती लोकांपर्यंत पोहचले त्यावर सर्व अवलंबून राहणार आहे. एका जातीवर निवडणुका जिंकता येत नाही. सगळ्यांनी मिळून मागच्या निवडणुका जिंकल्या, पुढच्या काळात तेच कराव लागेल.
Why should I go elsewhere for flag hoisting when my home is in Nashik? Chhagan Bhujbal’s displeasure over the post of Guardian Minister
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला