विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devvrat महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण असणार याच्या चर्चा महाराष्ट्रात सुरू झाल्या आणि मग गुजरातचे राज्यपाल असणाऱ्या देवव्रत यांच्यावर महाराष्ट्राचे राज्यपाल म्हूणन अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. Devvrat
महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर देवव्रत यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. देवव्रत यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राज्यपाल देवव्रत यांनी संस्कृतमधून शपथ घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील तिथे उपस्थित होते.
आचार्य देवव्रत हे त्यांच्या पत्नी दर्शना देवी यांच्यासह कालच म्हणजे १४ सप्टेंबर ला सकाळी अहमदाबादहून तेजस एक्सप्रेस या ट्रेनने मुंबईत दाखल झाले होते आणि आज लगेचच त्यांनी महाराष्ट्राचा अतिरिक्तपद भार स्वीकारला आहे.
कोण आहेत आचार्य देवव्रत ?
आचार्य देवव्रत हे मूळचे हरियाणाचे आहेत. मात्र त्यांच्या आयुष्यावर आर्य समाज आणि स्वामी दयानंद यांच्या शिकवणींचाही खोलवर प्रभाव आहे. आचार्य यांचा जन्म रोहतकमध्ये झाला आहे. राज्यपाल होण्यापूर्वी देवव्रत हे कुरुक्षेत्रातील एका गुरुकुलचे प्राचार्य देखील होते. सरकारने त्यांना प्रथम हिमाचलच्या राज्यपालपदी संधी दिली. त्यानंतर त्यांना गुजरातची जबाबदारी देण्यात आली. Devvrat
जुलै मध्ये माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यावर उपराष्ट्रपतीपदाच्या संभाव्य नावांमध्ये आचार्यांचाही उल्लेख होत होता. नैसर्गिक शेतीला एक मिशन बनवण्यात गुंतलेले आचार्य देवव्रत अतिशय सात्विक जीवन जगतात. त्यांच्या पुढकाराने, गुजरातमधील हलोल इथं देशातील पहिले नैसर्गिक कृषी विद्यापीठ देखील सुरू झाले आहे. अलीकडेच, आचार्य देवव्रत या विद्यापीठाला भेट देण्यासाठी आले होते. ६६ वर्षीय आचार्य देवव्रत ऑगस्ट २०१५ मध्ये हिमाचल प्रदेशचे राज्यपाल झाले होते.
आचार्य देवव्रत जुलै २०१९ पासून गुजरातचे राज्यपाल आहेत. यापूर्वी त्यांनी ऑगस्ट २०१५ ते जुलै 2019 पर्यंत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या अनुभवामुळे आणि प्रशासकीय कौशल्यामुळे त्यांना महाराष्ट्राचीही जबाबदारी देण्यात आली आहे. आता ते दोन्ही राज्यांच्या कारभारावर लक्ष केंद्रित करतील आणि राज्यपाल म्हणून त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडतील. Devvrat
Why was Devvrat chosen for the post of Governor of Maharashtra?
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा