Manoj Jarange : जरांगे विरुद्ध इतर मराठा अभ्यासक यांचा संघर्ष पेटणार?

Manoj Jarange : जरांगे विरुद्ध इतर मराठा अभ्यासक यांचा संघर्ष पेटणार?

Manoj Jarange

विशेष प्रतिनिधि 

मुंबई : राज्यसरकारने मराठा आरक्षणासंदर्भात जीआर काढल्यापासून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. ओबीसी नेते जीआरला विरोध करतांना दिसत आहेत, तर दुसरीकडे मराठा नेते या जीआरच स्वागत करत आहेत. मात्र आता मनोज जरांगे यांचे विश्वासू ॲड. योगेश केदार यांनी या जीआरमध्ये विशेष काही नसल्याचं म्हटलं आहे. केदार यांच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वादाची सुरुवात झाली आहे. Manoj Jarange



मनोज जरांगे यांचे विश्वासू आणि आधीच्या आंदोलनात सावलीसारखे त्यांच्या सोबत असणारे ॲड. योगेश केदार यांनी काल मनोज जरांगेंच्या हेतूवर शंका घेणारा एक व्हिडिओ केला. त्यात, मी मनोज दादांना सांगत होतो पण त्यांनी माझं ऐकलं नाही, असं म्हणत सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआरमध्ये काहीच विशेष नसल्याचही त्यांनी म्हटलं आहे.

सरकारने आधी जे दिलं होतं तेच आता परत दिलं आहे. मी मनोज जरांगे यांना सांगत होतो मात्र त्यांनी माझं ऐकलं नाही, असं म्हणत केदार यांनी मनोज जरांगेंवर आरोप केले आहेत. कधी काळी जरांगे यांच्यासोबत सावली सारखे असणारे योगेश केदार यांना देखील आता जरांगेंविरोधात वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. Manoj Jarange

सरकारने जीआर काढल्यापासून अनेक ओबीसी नेते जरांगेंविरोधात वक्तव्य करत आहेत. मात्र आता मनोज जरांगेंना वेळोवेळी वकिली सल्ला देणारे, त्यांना कायदेशीर मार्गदर्शन करणाऱ्या योगेश केदार यांनी देखील जरांगेंवर काही गंभीर आरोप केले आहेत. ‘मी मनोज दादांना सांगत होतो मात्र त्यांनी माझं ऐकलं नाही, पण त्यामुळे मी माझ्या समाजाला अंधारात ठेवणार नाही’ असं ते म्हणाले.

तसेच, जो नवीन जीआर सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात काढला आहे त्या जीआर वर टीका करतांनाच योगेश केदार यांनी मनोज जरांगेंच्या हेतूवरही शंका घेतली आहे. योगेश केदार यांचा व्हिडीओ काल सोशल मीडियावर चांगलाच गाजत होता. केवळ योगेश केदारच नाही तर इतर मराठा अभ्यासकही मनोज जरांगेंच्या आंदोलनाने मराठा समाजाच्या पदरात काहीही पडलं नसल्याचं म्हटलं होते. Manoj Jarange

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारनं काढलेला जीआर म्हणजे एक प्रकारची शुद्ध फसवणूक असून, या जीआर मध्ये काहीच विशेष नाही. जे आधी होतं तेच सरकारनं आता दिलं आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. एकीकडे मागण्या मंजूर झाल्या म्हणून जरांगेंनी गुलाल उधळून सरकारच्या निर्णयाच स्वागत केलं. तर दुसरीकडे अभ्यासकांकडूनच याच्या विरोधात वक्तव्य आल्यामुळे मराठा समाजामध्ये एक प्रकारचा संभ्रम निर्माण झाला आहे.

मात्र आता या अभ्यासकांना मनोज जरांगेंनी चांगलेच सुनावले आहे. ते म्हणतात की, ‘माझ्या मराठा समाजाला चांगलंच माहिती आहे. आता बोलणारे हे सगळे लोक तेव्हा कुठे होते? हे कधीही बैठकीला येत नाहीत ते कधीही मुंबईला येत नाहीत, ते कधीही समाजासाठी काहीही करत नाही. ही लोकं फक्त टीव्ही समोर बोलतात असं म्हणत त्यांनी अभ्यासकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. Manoj Jarange

मात्र दुसरीकडे योगेश केदार यांच्यासारखे अभ्यासक आता जरांगे यांच्या हेतूवर शंका घेऊ लागले आहेत. त्यामुळे प्रश्न पडतोय की केदार म्हणत आहेत त्या प्रमाणे खरंच मनोज जरांगे अभ्यासकांचं ऐकत नाहीयेत? की जरांगे म्हणतात त्याप्रमाणे हे अभ्यासक केवळ टीव्ही समोर बोलत आहेत?

Will a conflict erupt between Manoj Jarange and other Maratha scholars?

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023