विशेष प्रतिनिधी
पंढरपूर : गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी हात जोडत या विषयावर अधिक बोलणं टाळलं आहे. राजकारण आणि कुटुंब या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, दोन्ही पक्ष एकत्र येणार ही फक्त चर्चा आहे. जे काही होईल ते आपण बघालच असे त्यांनी सांगितले.
वैष्णवी हगवणे यांच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, वैष्णवी हगवणे बाबत झालेल्या घटनांचे समर्थन करत नाही, अशा घटना व्हायला नको आहेत. पक्षाने याबाबत भूमिका मांडलेली आहे. महिला आयोगाकडून दिरंगाई होते याबाबत सुद्धा पक्षाच्या पदाधिकाऱ्याने भूमिका मांडलेली आहे, अशी प्रतिक्रिया या प्रकरणावर सुनेत्रा पवार यांनी दिली आहे.
ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, या योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जातात. मात्र अजूनही वाढीव रकमेबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, यावर बोलताना सुनेत्रा पवार यांनी म्हटलं की, लाडक्या बहिणींच्या वाढीव हप्त्याबाबत अजितदादा निर्णय घेतील. ते जे बोलतात ते करतात, आपल्याला माहीत आहे. Sunetra Pawar
Will both nationalists come together? Sunetra Pawar has joined hands
महत्वाच्या बातम्या