Salman Khurshid : भारत महासत्ता, आक्रमणासाठी नव्हे, स्वरक्षणासाठी पाऊल, सलमान खुर्शीद यांनी मांडली भूमिका

विशेष प्रतिनिधी

सेऊल : Salman Khurshid जग आता भारताकडे एका महासत्तेच्या नजरेने पाहत आहे. आम्ही केवळ आक्रमणासाठी नव्हे, तर स्वतःचे रक्षण करण्यासाठी पावले उचलतो. आणि जगानेही मान्य केले की भारताला स्वतःचे रक्षण करण्याचा अधिकार आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य सलमान खुर्शीद यांनी सेऊलमध्ये भारताची भूमिका मांडताना सांगितले.Salman Khurshid

ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्यासाठी दक्षिण कोरियाच्या सर्वपक्षीय भारतीय प्रतिनिधी शिष्टमंडळाचे सदस्य खुर्शीद स्पष्टपणे सांगितले की, भारत आता वेगळ्या लीगमध्ये गेला असून, ही प्रतिष्ठा अबाधित ठेवण्याची जबाबदारी देशावर आहे.

पाहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई कारवायांना जागतिक स्तरावर समर्थन मिळवून देण्यासाठी ही मोहिम राबवली जात आहे.

खुर्शीद यांनी भारतीय समुदायाशी संवाद साधताना सांगितले की, “आता आपण जपानलाही मागे टाकले असून जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलो आहोत. ही प्रगती झपाट्याने होत आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये केवळ दहशतवादी ठिकाणांवर अचूक हल्ले करण्यात आले. जर त्यांनी आम्हाला प्रत्युत्तर दिले नसते, तर आम्ही थांबलो असतो. पण त्यांनी आमच्यावर हल्ला केला, त्यामुळे आम्ही त्यांचे एअरबेस आणि हल्ल्याची साधने निकामी केली.

खुर्शीद म्हणाले की, “दहशतवादाने बाधित झालेले देश आता त्याविषयीचा दृष्टिकोन बदलत आहेत. परंतु काही देश अजूनही दहशतवाद आणि स्वातंत्र्यलढे यातील सीमारेषा पाळत नाहीत. त्यामुळे भारताने आपला दृष्टिकोन आणि प्रचार जागतिक स्तरावर सातत्याने मांडत राहणे आवश्यक आहे. भारत विश्वगुरु आणि विश्वमित्र होण्याचे स्वप्न बघतो आहे. ही मोठी जबाबदारी आहे आणि त्यामुळे संयम अनिवार्य आहे,” असेही खुर्शीद यांनी नमूद केले.

या दौऱ्यात खुर्शीद यांच्यासोबत जेडीयूचे खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधीमंडळात अपराजिता सारंगी, बृज लाल, प्रधान बरुआ, हेमांग जोशी, डाव्या पक्षाचे जॉन ब्रिटास, तृणमूलचे अभिषेक बॅनर्जी आणि माजी राजदूत मोहनकुमार हे सहभागी आहेत.

भारत सरकारने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. या कारवाईत जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीनशी संबंधित १०० हून अधिक दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले.

India is a superpower, steps are taken for self-defense, not for aggression, Salman Khurshid presented his position

महत्वाच्या बातम्या