beaten in theater : ‘स्टोरी आधी सांगू नका’ असे सांगितल्यामुळे तरुणाला थिएटरमध्ये बेदम मारहाण

beaten in theater : ‘स्टोरी आधी सांगू नका’ असे सांगितल्यामुळे तरुणाला थिएटरमध्ये बेदम मारहाण

beaten in theater

विशेष प्रतिनिधी

पिंपरी :  beaten in theater चित्रपटगृहात कॉन्ज्युरिंग हा सिनेमा पाहताना ‘स्टोरी आधी सांगू नका’ असे सांगितल्यामुळे एका 29 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या तक्रारीवरून चिंचवड पोलीस ठाण्यात एका दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. beaten in theater



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुण आपल्या पत्नी आणि बहिणीसोबत सिनेमा पाहत होता. त्याचवेळी त्याच्या मागील सीटवर बसलेले एक दाम्पत्य सिनेमाची स्टोरी सांगत होते आणि गोंधळ घालत होते. त्यामुळे तरुणाने त्यांना शांत बसण्याची आणि सिनेमाची कथा आधी सांगू नये अशी विनंती केली. beaten in theater

तरुणाच्या या विनंतीमुळे संतापलेल्या आरोपीने लगेचच त्याची कॉलर पकडून त्याला मारहाण करायला सुरुवात केली. आरोपीने त्याला लाथा-बुक्क्यांनी मारून जमिनीवर पाडले. यात तरुणाच्या डाव्या हाताला, चेहऱ्याला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली. भांडण सोडवण्यासाठी त्याची पत्नी पुढे आल्यावर आरोपी आणि त्याच्या पत्नीने तिलाही मारहाण केली आणि दोघांना शिवीगाळ केली. beaten in theater

या घटनेनंतर पीडित तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अकिब जावेद निसार पटेल आणि त्याच्या पत्नीवर भारतीय न्याय संहिता ११७, ११५  आणि ३५२  नुसार गुन्हा दाखल केला आहे. beaten in theater

Young man brutally beaten up in theater for telling him not to tell the story first

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023