विशेष प्रतिनिधी
बारामती : बारामती नगरपरिषद निवडणुकीत अजित पवार गटाने लाखो रुपये देऊन उमेदवार फोडल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी केला आहे. जे आठ उमेदवार बिनविरोध आले आहेत, त्यापैकी चार जागांवर आम्ही उमेदवार दिले होते. पण, त्यांना पैसे देऊन फोडण्यात आले. जे विधानसभेला झाले, तेच आता नगरपरिषद निवडणुकीत होत आहे, असे युगेंद्र पवार म्हणाले. Yugendra Pawar
बारामती नगरपरिषदेची निवडणूक होत असून, आठ जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. आणखी चार जागा बिनविरोध करण्याचे प्रयत्न झाले, पण त्यात यश आले नाही. युगेंद्र पवार म्हणाले, “आपल्याविरोधात मोठी शक्ती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. त्यापैक चार ठिकाणी आमचे उमेदवार होते. प्रत्येकी २० लाख रुपये देऊन त्यांना फोडले. चौघांना विरोधी गटाने २० लाख रुपये दिल्याची चर्चा लोकांमध्येही होतेय. आमचे उमेदवार सर्वसामान्य होते. पुढचे दहा वर्षे कष्ट करूनही त्यांना २० लाख रुपये कमावता येणार नाहीत. दोन उमेदवार नवीनच आले होते. ते कुठल्याच पक्षात नव्हते. आम्हाला संधी दिल्यास चांगलं काम करू म्हणाले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवला पण ते फुटले. Yugendra Pawar
युगेंद्र पवार म्हणाले, “आमच्याविरोधात मोठी शक्ती आहे. त्यांच्याकडे खूप पैसा आहे. सत्ता आहे. संस्था आहेत. सगळे तिथे काम करत आहेत आणि त्यांच्यावर दबाव टाकला जात असेल, तर दोन-तीन लोक जाणं साहजिकच आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही ही दहशत बघायला मिळाली होती. आता नगरपालिकेच्या निवडणुकीतही हेच दिसत आहे. Yugendra Pawar
बारामती नगरपरिषदेच्या प्रभाग दोन अ मधून अनुप्रिता तांबे, पाच अ मधून किशोर मासाळ, सहा अ मधून धनश्री बांदल, सहा ब मधून अभिजित जाधव, आठ अ मधून श्वेता नाळे, १७ ब मधून शर्मिला ढवाण, १८ ब मधून अश्विनी सातव, २० ब मधून अफरीन बागवान हे आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगरसेवक पदासाठी अर्ज भरलेल्या ७७ जणांनी, तर नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ पैकी आठ जागा निकालाआधीच बिनविरोध जिंकल्या आहेत.
http://youtube.com/post/UgkxOuMMh7CbKYbjfwKref5fxYPFvvhunYO_?si=Ulieu8FaN3pTKNeW
Yugendra Pawar alleges Ajit Pawar offered 20 lakh rupees to each candidate to force withdrawals
- महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : प्रो बैलगाडा लीग सुरू करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घाेषणा
- Sharad Pawar : काॅंग्रेसला ठाकऱ्यांचा नकाे हात, शरद पवारांची घेणार साथ
- संविधानिक संस्थांवर काँग्रेसच्या हल्ल्यांचा निषेध, २७२ माजी अधिकारी व न्यायमूर्तींचे खुले पत्र
- सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य, नाेटिफिकेशन काढण्यासाठी थांबण्याचे न्यायालयाचे निर्देश



















