विशेष प्रतिनिधी
धुळे : सोयाबीन खरेदीच्या मुदत वाढीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
संपूर्ण राज्यामध्ये सोयाबीन खरेदी मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र काल या सोयाबीन खरेदीची मुदत संपल्यानंतर राज्यातील बहुतेक जिल्ह्यात सोयाबीन खरेदीला मुदत वाढ मिळण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर रावल यांनी धुळ्यात माध्यमांशी बोलताना सांगितले की, आतापर्यंत झालेल्या सोयाबीन खरेदीला जानेवारीपासून आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली असून, आता देखील आपण मुदतवाढीबाबत केंद्राकडे प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती जयकुमार रावल यांनी दिली आहे.
भारताच्या इतिहासात महाराष्ट्रात आतापर्यंत जवळपास सव्वा 11 लाख टन इतकी सोयाबीन खरेदी झाली असून, साडेचार हजार रुपये भावाने सोयाबीनची खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांची कुठलीही गैरसोय होणार नाही, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती देखील यावेळी जयकुमार रावल यांनी दिली.
मागील वेळी सोयाबीन दर पाडून शेतकऱ्यांचं नुकसान केलं. नाफेडच्या माध्यमातून खरेदी करून खरेदी करण्याचा कोटा संपला. केंद्रातून तो कोटा वाढवून आणावा. हे जर झालं नाही तर आम्ही मोर्चा काढून सगळं सोयाबीन जिल्हाधिकारी कार्यालय पुढे नेऊ, असा इशारा काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला होता.
राज्यातील विशेषकरून विदर्भ व मराठवाड्यातील सोयाबीन शेतकऱ्यांकडे अद्याप लाखो क्विंटल सोयाबीन पडून आहे. ६ फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र सुरु ठेवण्यात येणार आहेत. परंतु या कालावधीत शेतकऱ्यांकडील सर्व सोयाबीन खरेदी होणार नाही, राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांकडून सर्व सोयाबीन खरेदी करेपर्यंत ही खरेदी केंद्रे सुरु ठेवावीत वेळप्रसंगी खरेदी केंद्रांची संख्या वाढवा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती.
राज्यात ३० लाखांहून अधिक सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत, यातील जवळपास साडेसात लाख सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी राज्यभरातील विविध खरेदी केंद्रांवर नोंदणी केली आणि त्यातील साधारणपणे तीन- तीनसाडेतीन लाख शेतकऱ्यांकडील सोयाबीन खरेदी करण्यात आल्याचे समजते. यातील बहुतांश शेतकऱ्यांनी बाजारात मिळेल त्या किंमतीला सोयाबीन विकले आहे. खुल्या बाजारात व बाजार समितीत सोयाबीनला ३५०० ते ४००० हजार रुपये भाव मिळत आहे.
तर हमी भाव ४८५१ रुपये आहे. सोयाबीनसाठी होणारा खर्च व बाजारातील भाव पाहता शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही काळजी घेत खरेदी केंद्रांची सख्या वाढवावी व जोपर्यंत शेतकऱ्यांकडील सर्व सोयाबीनची खरेदी होत नाही तोपर्यंत खरेदी केंद्रे सुरु ठेवावीत, अशी मागणी त्यांनी केली होती.
A proposal to the Center for extension of soybean term, informed jaykumar rawal
महत्वाच्या बातम्या
- अंजली दमानिया यांच्यावर धनंजय मुंडे दाखल करणार फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला
- पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात, दिल्लीत आज मतदान
- Anjali Damania : अंजली दमानिया यांनी वाचला धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचा पाढा, कृषीमंत्री असताना दुपटीहून दराने खरेदी
- Supriya Sule : पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आश्वासन