विशेष प्रतिनिधी
मुंबई : तुम्ही मराठी घाणेरडे लोकं आहात. तुम्ही मच्छी, मटण खाता असे म्हणत माझ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला असा आरोप योगीधाम अजमेरा हाईट्स राडा प्रकरणातील जखमी अभिजीत देशमुख यांनी केला आहे.
कल्याणमधील योगीधाम परिसरात अजमेरा हाईट्स या इमारतीमध्ये राहणाऱ्या देशमुख कुटुंबीयांना अखिलेश शुक्ला यांनी काही गुंड बोलावून मारहाण केली होती. अभिजीत देशमुख आणि त्यांचे भाऊ धीरज देशमुख या दोघांना परप्रांतीयांच्या टोळक्याकडून लोखंडी रॉडने मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी रात्री कल्याणच्या योगीधाम परिसरात मराठी माणसांचा संताप झाला आहे.
अभिजीत देशमुख म्हणाले, परवा रात्री मी भांडण सोडवायला जात असताना गुंडानी ज्यांचे भांडण झाले त्यांच्यावर हल्ला केला. मी त्यांचे वाद सोडवायला गेलो असता माझ्यावर देखील हल्ला करण्यात आला. अखिलेश शुक्ला याची सोसायटीमध्ये दहशत आहे, तो सर्वांना धमकी देतो. वाद सुरु असतना ते म्हणाले की तुम्ही मराठी घाणेरडे लोकं आहात, तुम्ही मच्छी, मटण खाता, असे म्हणत माझ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.
माझे सहकारी मित्र, भाऊ सर्व पोलीस स्टेशनला गेले होते. मात्र त्यांना पहाटे पर्यंत बसवून ठेवण्यात आले. तक्रार दाखल करण्यात आली नाही. शुक्लाला वेगळी ट्रीटमेंट पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आणि आम्हाला वेगळी. त्यामुळे पोलीस स्टेशन मॅनेज झाले आहे, असा आरोपही अभिजीत देशमुख यांनी केला आहे.
कल्याणच्या योगीधाम परिसरात असणाऱ्या अजमेरा हाईटस् या उच्चभ्रू रहिवाशांच्या सोसायटीत हा प्रकार घडला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MTDC मध्ये अकाऊंटंट मॅनेजर असलेले अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळवीकट्टे हे अजमेरा सोसायटीत आजूबाजूला राहतात. नेहमीप्रमाणे अखिलेश शुक्ला यांच्या पत्नी गीता या घराबाहेर देवपूजा करुन धूप लावतात. या धूपाचा प्रचंड धूर होतो. हा धूर वर्षा कळवीकट्टे यांच्या घरात जायचा. या धुराचा घरात असलेल्या तीन वर्षाच्या बाळाला त्रास व्हायचा. तसेच घरात असलेली वयोवृद्ध आईलाही दम लागायचा. त्यामुळे कळवीकट्टे कुटुंबीयांनी शुक्ला यांना बाहेर धूप न लावण्याविषयी विनंती केली होती. यावरुन अखिलेश शुक्ला यांची पत्नी गीता शुक्ला यांनी उद्दामपणे कळवीकट्टे कुटुंबीयांशी वाद घालायला सुरुवात केली.
हा वाद सुरू असताना बाजूला राहणारे अभिजीत देशमुख आणि त्यांचे भाऊ धीरज देशमुख यांनी वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. देशमुख यांनी वाद सोडण्याचा प्रयत्न केला. याचा राग शुक्ला याला आला आणि शुक्लाने 10 ते 15 गुंडांना बोलावून देशमुख बंधूंना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या घटनेत अभिजित देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. शुक्ला हे या सोसायटीत वादग्रस्त असल्याचे समोर आले आहे. अनेक मराठी माणसांना शुक्ला याने त्रास दिला आल्याचा आरोप सोसायटीतील नागरिकांनी केला आहे.
Abhijeet Deshmukh accused of assault in Kalyan
महत्वाच्या बातम्या
- Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी दिलेल्या धक्क्यामुळे खाली पडून भाजप खासदाराच्या डोक्याला गंभीर दुखापत
- Sharad Pawar ऊसाला जास्त भाव मिळावा यासाठी शरद पवारांनी पत्र लिहायला हवे होते, सदाभाऊ खोत यांचा सल्ला
- salman khan खो-खो विश्वचषकाचा पहिला सामना भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये रंगणार
- JPC formed वन नेशन-वन इलेक्शन विधेयकासाठी जेपीसी स्थापन