विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray समर्थ रामदास म्हणाले होते की, मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा. तसं भाजपावाले बोलत आहेत की, भ्रष्टाचार तितुका मेळवावा भाजपा पक्ष वाढवावा, अशी बोचरी टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली आहे.Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे यांनी शिवालय कार्यालय येथे कोळी बांधवांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी भाजपवर टीका करताना एक गोष्ट सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, एका वडिलांनी आपल्या मुलाला विचारलं की, भविष्यात तुला काय करायचं आहे? मुलाने उत्तर दिलं की, मला भाजपात जायचं आहे आणि देशासाठी काहीतरी करायचं आहे. त्यावर वडील बोलले की, असं डायरेक्ट भाजपामध्ये जाऊ नको. आधी वेगळ्या पक्षात जा आणि तिथे काहीतरी मोठा घोटाळा कर मग भाजपावाले तुला सन्मानाने त्यांच्या पक्षात घेतील. तू थेट भाजपात गेलास तर तुला उपऱ्यांच्या सतरंज्या उचलाव्या लागतील.Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोनाचा काळ हा जागतिक संकटाचा होता. त्यामुळे आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकलो नाही. परंतु जर आमचं सरकार पुन्हा आलं असतं तर तुमच्यावर लढण्याची वेळ आलीच नसती. बोललो की केलंच पाहिजे. आपलं सरकार आलं असतं तर तुमच्यावर लढण्याची वेळ आलीच नसती. परंतु शिवसेनेची स्थापनाच भूमीपुत्रांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी झाली आहे आणि महाराष्ट्राचा भूमीपुत्र मराठी आहे. आपण आपल्या परंपरागत चाललेल्या गोष्टी करत इथे राहत आलेलो आहोत. पण हल्ली या परंपरागत गोष्टी नाहिशा होत चालल्या आहेत. तोच एक मुद्दा घेऊन सरकार महाराष्ट्रातून मराठी संपवायला निघाली आहे.
ससून डॉकच्या जागेविषयी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सध्या वाद सुरू आहे. ससून डॉकमधील गोडाऊनमध्ये पिढ्यानपिढ्या व्यवसाय करणारे मासळी व्यावसायिक अनेक वर्षे महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विकास महामंडळाला (एमएफडीसी) भाडे देत आहेत. मात्र ते भाडे आपल्याला मिळालेच नाही, असा दावा करून मुंबई पोर्ट प्राधिकरणाने मासळी व्यावसायिकांना बाहेर काढण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. त्यांना उद्धव ठाकरे म्हणाले,
आता शिवसेना तुमच्यासोबत आली आहे आणि तुमच्यासाठी आम्ही मैदानात उतरली आहे. परंतु काही दिवसांनी ज्यांच्यासाठी आम्ही मैदानात उतरलोय तेच गायब झाले, असं होऊ देऊ नका. एकत्र रहा आणि एकजुटीने रहा. शिवसेनाप्रमुख बोलले होते की, अन्यायावरती तुटून पडा, पण मी म्हणेन की, अन्याय करणाऱ्याला अन्यायासकट तोडून टाका.
“Accumulate Corruption to Expand the BJP,” Uddhav Thackeray’s Scathing Attack on BJP
महत्वाच्या बातम्या
- Sadhvi Pragya Singh : भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देवच करेल शिक्षा, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा संताप
- एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना न्यायालयान कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा
- बांग्लादेशीयांची बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी टास्कफोर्स, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
- Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या तमाशा शब्दावर मुख्यमंत्र्यांचा जाेरदार हल्लाबाेल, हा तर भारतीय सैन्याचा अपमान