विशेष प्रतिनिधी
मुंबई : शहाण्या थोडक्यात वाचला. माझी सभा झाली असती तर…असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची चांगलीच फिरकी घेतली. Ajit Dada Teases Rohit Pawar
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज 40 स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी अनेक नेते मंडळी प्रीतीसंगमावर गेले होते. शरद पवार यांच्यासोबत रोहित पवार देखील प्रीती संगमावर गेले होते. इथून परतत असताना रोहित पवार आणि अजित पवार यांची भेट झाली. यावेळी अजित पवारांनी रोहित यांना टोला लगावला.
Adani Controversy : अदानी प्रकरणावरून काँग्रेसच अडचणीत, हे मुख्यमंत्री अडकु शकतात..
बच गया… काकाचं दर्शन घे दर्शन…, असं अजित पवार म्हणाले. यावेळी एकच हशा पिकला. रोहित पवारांनीही वाकून अजित पवारांना नमस्कार केला. शहाण्या थोडक्यात वाचला. माझी सभा झाली असती तर काय झालं असतं? बेस्ट ऑफ लक असे अजित पवार रोहित पवारांना म्हणाले.
रोहित पवार हे नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. गेल्या वेळी ती साधारण पक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणाऱ्या रोहित पवार यांना यंदा विजयासाठी चांगलेच झगडावे लागले. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम शिंदे यांच्या विरोधात केवळ 1243 मतांनी विजय झाला. हा संदर्भ अजित पवार यांच्या वक्तव्याला होता.
रोहित पवार सातत्याने अजित पवार यांच्या विरोधात वक्तव्य करत होते. मात्र अजित पवार यांनी त्यांना थेट उत्तर देणे टाळले होते. शिवाय कर्जत जामखेड मतदार संघात त्यांनी सभा घेतली नाही.