विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनीही ठाकरी भाषेत पालकांना आवाहन केले आहे. मुलींवर हात टाकणाऱ्यांची हिंमत वाढली आहे. पण, जे मुलींवर हात टाकतात, त्यांचे हातपाय तोडून नंतर पोलिसांकडे द्या, असे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे. Amit Thackeray
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने पुण्यातील कोंढवामध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार आणि बॅग वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये बोलताना अमित ठाकरे यांनी हे विधान केले. ते म्हणाले, मला खर तर विद्यार्थी सेनेचे खूप आभार मानायचे आहेत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचं माझं स्वप्न तुम्ही साकार करत आहात, विद्यार्थ्यांशी बोलायला मी फार लहान आहे. मला वाटतं शाळेत जाणार प्रत्येक मुल, मुलगा किंवा मुलगी सुरक्षित असावेत. काही गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, आम्ही तुमच्यासोबत आहोतच, माझा मुलगा आता शाळेत जाणार आहे,
मी आज पालकांशी बोलायला आलो आहे. कारण जे माझं स्वप्न होतं आणि जे तुमचंही स्वप्न आहे की, मुलगा-मुलगी शाळेत गेल्यावर ते सुरक्षित असावं. त्यांच्या आयुष्यात काही अडचणी नसाव्यात. महाविद्यालयात गेल्यावरही ते सुरक्षित असावेत. काहीही अडचण असेल, तर सोडवली पाहिजे. भीती काय असते हे मला माहिती आहे कारण माझा मुलगा शाळेत जाणार आहे. एक भीती असते की, मुलाला काही झालं, मुलीला काही झालं, तर पुढे काय? उशिरा फोन आला, तर पुढे काय? इकडे हिमंत वाढली आहे. त्यांचे हात पाय तोंडून त्यांना तुम्ही पोलिसांना दिलं पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आपण राहतो. हे राज्य असं नाहीये की, आपण मुलींवर हात टाकू शकतो. त्या मुलांचे हात पाय तोडून आपण त्यांना पोलिसांकडे दिलं पाहिजे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की, शाळेत जर पाठवत असाल… महाविद्यालयात पाठवत असाल… आपली सत्ता नसेल, तरी राज साहेब सत्तेत आहेत, असेही अमित ठाकरे म्हणाले.
Amit Thackeray also appealed to the Thackeray language
महत्वाच्या बातम्या
- Sadhvi Pragya Singh : भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देवच करेल शिक्षा, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा संताप
- एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना न्यायालयान कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा
- बांग्लादेशीयांची बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी टास्कफोर्स, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती