Devendra Fadnavis : अटक करून दाखवाच…अर्बन नक्षली सारखे वागाल तर तुम्हालाही अटक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज ठाकरे यांना प्रत्युत्तर

Devendra Fadnavis : अटक करून दाखवाच…अर्बन नक्षली सारखे वागाल तर तुम्हालाही अटक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज ठाकरे यांना प्रत्युत्तर

Devendra Fadnavis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Devendra Fadnavis अटक करून दाखवाच या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आव्हानाला जोरदार प्रत्युत्तर देताना कायद्याने राहतो, त्याला अटक करण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्ही अर्बन नक्षली सारखे वागाल तर तुम्हालाही अटक होईल, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले आहे.Devendra Fadnavis

शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावरून बोलताना राज ठाकरे म्हणाले होते की, तुम्ही एखाद्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकते. त्यासाठी तुम्हाला अर्बन नक्षली ठरवण्यात येत आहे. मात्र, मराठी माणसाच्या थडग्यावर तुम्हाला उद्योग उभे करू देणार नाही. उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा सन्मान ठेवावाच लागेल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. एखाद्याला अर्बन नक्षली म्हणून अटक करून दाखवाच, असे आवाहन देखील राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. यावरुन फडणवीस यांनी राज ठाकरे यांना प्रत्यु्त्तर दिले आहे.

राज ठाकरे यांच्या या आव्हानाला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी त्यांना का अटक करू? हा कायदा न वाचता अशी टीका केली जात असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तुम्ही जर अर्बन लक्षली सारखे वागत नाही, त्यामुळे तुम्हाला अटक कराण्याचा प्रश्नच येत नाही. जे लोक कायद्याच्या विरोधात वागतील, त्यांच्याकरता तो कायदा तयार झाला आहे. आंदोलकांविरुद्ध कायदा नाही. सरकार विरुद्ध बोलायची यामध्ये पूर्णपणे मुभा आहे. त्यामुळे कायदा न वाचता केलेली ही काँमेंट असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

Arrest them and show them…if you behave like an urban Naxal, you too will be arrested, Chief Minister Devendra Fadnavis’ reply to Raj Thackeray

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023