विशेष प्रतिनिधी
मुंबई : Badlapur राज्याला हादरवून सोडणाऱ्या बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. विठ्ठलवाडी, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये तीन ठिकाणी पोलिसांनी छापे टाकून बेकायदेशीररीत्या घरांमध्ये सुरू असलेल्या आयव्हीएफ केंद्रातील इंजेक्शन आणि औषध जप्त केले आहेत. पोलिसांनी सुमारे आठ लाख रुपयांचे इंजेक्शन आणि विविध औषधसाठा जप्त केला आहे.Badlapur
बदलापूर येथील स्त्री बीज विक्री प्रकरणाचे धागेदोर ठाणे जिल्ह्याच्या बाहेर पर्यंत पोचलेले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणात ज्या तीन महिलांना अटक झालेली आहे केवळ त्यांच्यापर्यंतच हे प्रकरण थांबले नसून यात काही सोनोग्राफी सेंटर्स आणि IVF सेंटर्सचा देखील सहभाग आहे. या प्रकरणाची लिंक अनेक मोठ्या आयव्हीएफ सेंटर पर्यंत जात आहे. अनेक ठिकाणी पोलीस आणि आरोग्य विभागाने धाडी टाकण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.Badlapur
बदलापूरात स्त्री बीजाच्या अवैध विक्रीचं रॅकेट उघड झालं आहे. याप्रकारचं हे भीषण रॅकेट चक्क एका घरातून चालवलं जात होतं. सुलक्षणा गाडेकर या महिलेनं घरामध्ये स्त्री बीज वाढवणारी इंजेक्शन्स बेकायदेशीरपणे साठवून ठेवली होती, असा आरोप आहे.
गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवून हे इंजेक्शन दिलं जात होतं. त्यानंतर गर्भाशयात स्त्री बीजांची वाढ झाल्यावर संबंधित महिलांना IVF सेंटरमध्ये पाठवलं जात होतं. तिथल्या डॉक्टरांकडून ऑपरेशन थिएटरमध्ये स्त्री बीज काढून त्यांची बेकायदेशीर विक्री केली जात होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना सावंत यांच्या पथकानं सुलक्षणा गाडेकर यांच्या घरी धाड टाकून हे रॅकेट उघडकीस आणलं. या प्रकरणी गाडेकर यांच्यासह अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे एक मोठं इंटरनॅशनल रॅकेट असण्याची शक्यता आहे.
ज्या महिलांच्या गर्भात स्त्री बीज प्रक्रिया केली जात असे अशा महिलांना 15 ते 20 हजार रुपये दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे. तर मध्यस्थी काम करणाऱ्या महिलांना तीन हजार रुपये दिले जात असल्याची माहिती आहे. स्त्री बीज हे तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, केरळ या राज्यांमध्ये पाठवली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
Badlapur Egg Sale Racket Busted; Police Seize ₹8 Lakh Injection Stock from Illegal IVF Centre
महत्वाच्या बातम्या
- शक्तीपीठ महामार्ग विरोधातील आंदोलन तीव्र करणार, राजू शेट्टी यांचा इशारा
- Rahul Gandhi राहुल गांधी यांची भिवंडी न्यायालयात हजेरी; भाजपने ठाण्यात दाखवले काळे झेंडे
- Bhiwgan Case : भिगवण प्रकरणातील तरुणीची सुधार गृहात रवानगी
- Muslim Reservation : मुस्लिम समाजाच्या आरक्षण रद्द विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका