विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल अवमान याचिकेच्या सुनावणीसाठी शनिवारी (ता.२१ फेब्रु.) राहुल गांधी भिवंडी न्यायालयात हजर झाले. या प्रकरणात, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील-चाकूरकर हे जामीनदार होते. पाटील यांचे निधन झाल्याने राहुल गांधी यांच्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे नवीन जामीनदार बनले आहेत. राहुल यांच्या वतीने त्यांचे वकील नारायण अय्यर यांनी न्यायालयात बाजु मांडली. दरम्यान, ठाण्यातील मुलुंड टोल नाका येथे राहुल गांधींच्या आगमना वेळेस भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी त्यांना काळे झेंडे दाखवुन निदर्शने केली. सर्व आंदोलकांना नवघर पोलिसांनी ताब्यात घेतले.Rahul Gandhi
सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भिवंडीतील एका प्रचारसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घडवून आणल्याचे वादग्रस्त विधान केले होते. याप्रकरणी रा. स्व. संघाचे राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. या खटल्याची सुनावणी भिवंडी न्यायालयात सुरू आहे.Rahul Gandhi
राहुल गांधी यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर हे जामीनदार राहिले होते. १२ डिसेंबर २०२५ रोजी पाटील यांचे लातुर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. कायद्यातील तरतुदीनुसार, नवीन जामीनदार द्यावा लागणार असल्याने न्यायालयाने त्याबाबतचे निर्देश देताना राहुल गांधी यांना समक्ष हजर राहण्याचे बजावले होते. त्यानुसार, शनिवारी (ता.२१ फेब्रु.) राहूल गांधी भिवंडी न्यायालयात हजर झाले. त्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे जामिन राहिले आहेत.Rahul Gandhi
या दरम्यान राहुल गांधी यांच्या आगमना वेळेस ठाण्यातील मुलुंड टोल नाका येथे भाजयुमोचे समर्थ नायक, ज्ञानदिप जाधव आदीसह भाजप कार्यकर्त्यानी राहुल यांना काळे झेंडे दाखवत निदर्शने केली. राहुल गांधी नेहमीच भारत विरोधी भूमिका घेतात, तसेच एआय समिटच्या कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्त्यानी केलेल्या अर्धनग्न आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणुन हे आंदोलन केल्याचे भाजयुमोच्या निदर्शकांनी सांगितले.Rahul Gandhi
Rahul Gandhi Appears in Bhiwandi Court; BJP Waves Black Flags in Thane
महत्वाच्या बातम्या
- सरकारची कामे गलगोटिया विद्यापीठासारखीच बनावट, आदित्य ठाकरे यांची टीका
- राज्यसभेत शरद पवारांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या अटी
- शिवजयंतीनिमित्त महसूल विभागाची मोठी घोषणा; एका दिवसात १५ महसूल सेवा निकाली काढणार
- रोहित पवार यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी, सुप्रिया सुळे यांची मागणी