विशेष प्रतिनिधी
ठाणे : Eknath Shinde मुंबईमध्ये मोफत घर देण्याचं बाळासाहेबांचे स्वप्न आता सत्यात येतंय.मी गृहनिर्माण मंत्री झाल्यानंतर म्हाडाची एक नवीन पॉलिसी आणली. या नवीन पॉलिसीमध्ये परवडणारी घरे याला प्रथम प्राधान्य दिले आहे. बाळासाहेब म्हणायचे की, मुंबईमध्ये चाळीस लाख झोपडपट्टीवासियांना मोफत घर देण्याचं, तेव्हा लोकांना वाटलं की हे साध्य होईल का. परंतु खऱ्या अर्थाने त्याची सुरुवात आता आपण केलेली आहे, असे समाधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.Eknath Shinde
ठाणे येथील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते म्हाडा कोकण मंडळ सोडत – 2025 अंतर्गत 5 हजार 354 सदनिका आणि 77 भूखंड विक्रीसाठी संगणकीय सोडत झाली. यावेळी शिंदे बोलत होते. ते म्हणाले, आपण टप्प्याटप्प्याने घर बांधतोय आणि त्याची सुरुवात झाली, याचा मला अभिमान आहे. मुंबईतील रमाबाई आंबेडकर नगर मधील घरांचा प्रकल्प आहे. तिथे एसआरए आणि एमएमआरडीए एकत्रितपणे काम करीत आहेत. मुंबई महानगर प्रदेशाचा आपल्याला पुनर्विकास करायचा असेल तर रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर हे सगळे जॉईंट वेंचर केले पाहिजेत. कारण सरकारी प्राधिकरणावर लोकांचा विश्वास असतो आणि वेळेमध्ये काम करण्याची जी क्षमता आहे. यामधून मोठ्या प्रमाणावर लाखो घरे तयार होतील.यामध्ये आपल्या नोकरदार महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी वसतीगृह आणि गिरणी कामगारांसाठी घरे उपलब्ध होणार आहेत. पंतप्रधान आवास योजनेमधून देखील पंतप्रधान मोदी यांनी दोन कोटी घरांचे उद्दिष्ट ठेवले होते. क्लस्टरच्या माध्यमातून आपण एक मोठा निर्णय घेतला. जसंEknath Shinde
जीएसटीच्या माध्यमातून घरांच्या किमतीमध्ये फरक पडलेला दिसेल आणि पंतप्रधान मोदींनी जीएसटीचे दोन स्लॅब काढून टाकले असून जीवनावश्यक वस्तूंना त्यामध्ये फायदा झाला. यामध्ये घर घेणाऱ्यांनाही फायदा होईल, नोकरदार वर्गाला देखील त्याचा फायदा होतोय. छोटे-मोठे व्यापारी, दुकानदार त्यांनाही त्याचा फायदा होतो. ज्येष्ठांसाठी देखील आपण पॉलिसी केलेली आहे आणि ज्येष्ठांसाठी गृहनिर्माण धोरण राबविणारे महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असून त्यांच्या आशीर्वादाने आपण हे सर्व काम करत असतो. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन यासाठी करेल की, हाऊसिंग फॉर ऑल, रोटी कपडा मकान हा जो विषय आहे, तो म्हाडाच्या माध्यमातून आपण पूर्ण करत आहोत आणि मुंबई आणि एमएमआर मध्ये मोठ्या प्रमाणावर घरं निर्माण कशी होतील आणि तिथे लोकांना कसा फायदा होईल हे देखील पाहतोय. क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये ओपन स्पेस गार्डन, मैदान, वैद्यकीय या सगळ्या सुविधा आपण देतोय आणि म्हणूनच क्लस्टर देखील महाराष्ट्रामध्ये, मुंबई एमएमआरमध्ये प्रभावी ठरेल. देशामध्येच नाही जगामध्ये ही क्लस्टर योजना आपल्या राज्याने पहिली सुरू केलेली आहे, असेही ते म्हणाले.
म्हाडाच्या कोकण विभागाची जवळपास 5 हजार 354 घरांची सोडत झाली. आज सगळ्यांच्याच दृष्टीने आनंदाचा दिवस आहे. सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचा स्वप्नपूर्तीचा आजचा दिवस आहे. घर हे प्रत्येकाचं स्वप्न असते आणि त्याची पूर्तता करण्याचा आजचा दिवस आहे. ज्यांना घराची लॉटरी लागली आहे त्यांची दिवाळी नवीन घरात होईल, गोड होईल आणि ज्यांना लॉटरी नाही लागली त्यांनीही निराश होवू नये. एक इमारत किंवा घर म्हणजे चार भिंतीच घर किंवा एक इमारत एवढ्या पुरतं ते मर्यादित नसून घर हे प्रत्येकाच्या आयुष्यातले एक मोठे स्वप्न असते आणि त्यामध्ये कुटुंबाच्या सुरक्षिततेचा, आत्मसन्मानाचा आणि सुख समृद्धीचा पाया हे घर आहे. म्हणूनच घराचं स्वप्न साकार करणाऱ्या म्हाडाचं मनापासून अभिनंदन करतो. आम्ही सुरुवातीपासून हीच भूमिका ठेवली की, जी लॉटरी निघेल त्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे. कुणालाही कुणाच्या माणसासाठी शिफारस करता येणार नाही आणि शिफारस केली तरी त्याला घर मिळणार नाही. अशा पारदर्शक कार्यपद्धतीमुळे म्हाडावर विश्वास निर्माण होण्याची गती वाढली आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Balasaheb’s dream of providing free houses in Mumbai has now come true; Eknath Shinde hands over five thousand MHADA houses
महत्वाच्या बातम्या
- Cooperation Minister, : लोकांना कर्जमाफीचा नाद, सहकार मंत्र्यांच्या असंवेदनशील विधानावर संताप, म्हणण्याचा अर्थ ताे नव्हता असा खुलासा
- Nitesh Rane : एमआयएमच्या नावाखाली हिरव्या सापांची वळवळ, पुन्हा सभा हाेऊ द्यायची का विचार करू, नितेश राणेंचा इशारा
- Ajit Pawar : तुम्हाला पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाही, गैरप्रकार करणाऱ्यांना अजित पवार यांचा इशारा
- महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीत रंगणार ‘पवार विरुद्ध मोहोळ’ सामना