विशेष प्रतिनिधी
मुंबई : Mumbai High Court मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता मोठी खळबळ उडाली. न्यायालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी मिळाल्यानंतर संपूर्ण इमारत तातडीने रिकामी करण्यात आली. वकिलांना, कर्मचाऱ्यांना आणि न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या सर्वांना तत्काळ बाहेर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. Mumbai High Court
न्यायालय परिसरात सुरक्षारक्षकांनी तातडीने सर्व मार्ग बंद केले. परिसरात पोलिसांचा ताफा दाखल झाला. बॉम्ब शोध पथक आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. दरम्यान, न्यायालयीन कामकाजात अचानक व्यत्यय आल्याने सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. Mumbai High Court
या परिस्थितीबाबत पुण्याचे वरिष्ठ वकील अॅड. जतीन आढाव यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले, “दुपारी अचानक गडबड उडाली. न्यायालयीन काम चालू असतानाच सर्वांना बाहेर पडण्यास सांगण्यात आले. इमारत रिकामी करताना सर्वांनी सुरक्षिततेसाठी सहकार्य केले. बाहेर येताच पोलिसांनी चौकशी सुरु केली.”
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, धमकी कोणाकडून आणि कशी आली याचा तपास सुरू आहे. ही धमकी ईमेलद्वारे आली की फोनद्वारे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र प्राथमिक तपासात ती खोटी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तरीही, पोलिसांकडून कोणतीही जोखीम न घेता संपूर्ण इमारतीची तपासणी सुरू आहे.
सुरक्षा यंत्रणांकडून नागरिकांना शांत राहण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उच्च न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात असून तपास पूर्ण होईपर्यंत कोणालाही प्रवेश दिला जात नाही.
Bomb threat to Mumbai High Court, building evacuated
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा