विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : हिंदुत्ववादी भूमिका उद्धव ठाकरेंनी सोडायला नको होती. काँग्रेस पक्षाबरोबर युती केल्यानंतर त्याचा फटका बसला असा घरचा आहेर देत छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडेले हे आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटासाठी हा धक्का मानला जात आहे.
शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर नंदकुमार घोडेले यांनी म्हटलं की, “जवळपास ३० वर्षांपासून शिवसेनेत काम करत आहोत. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मागच्या काळात राज्यात ज्या प्रकारे काम झालं आहे, त्या कामाला प्रभावित होऊन आम्ही शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहोत. आता भविष्यात नागरिकांची कामे करायची असतील तर सत्तेबरोबर असणं गरजेचं आहे. या भूमिकेतून आम्ही शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटातील कोणाशीही माझी नाराजी नाही. मात्र, शिवसेना शिंदे गटात गेल्यानंतर आणखी काम करण्याची संधी मिळेल”, असं नंदकुमार घोडेले यांनी म्हटलं आहे.
माजी महापौर हे आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत, यासंदर्भात बोलताना माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं की, “माजी महापौर नंदकुमार घोडेले यांना शिवसेना ठाकरे गटाकडून छत्रपती संभाजीनगर शहरांचं महापौर केलं होतं. मात्र, आता ते स्वार्थासाठी तिकडे गेले आहेत. शिवसेना शिंदे गटात जाऊन त्यांना काय मिळणार? जो मान सन्मान इकडे होता, तो मान सन्मान त्यांना तिकडे मिळणार नाही”, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं.
माजी महापौर नंदकुमार हे आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत, यासंदर्भात बोलताना अंबादास दानवे यांनी म्हटलं की, “संघटना ही एक प्रक्रिया असते. त्यामुळे ही प्रक्रिया सुरु असते. जसे संघटनेतून बाहेर गेले तसे अनेकजण आलेले देखील आहेत. काही लोकांना कमी वेळेत जास्त गोष्टी हव्या असतात. मात्र, आतापर्यंत जे पदे मिळाले आहेत त्याचाही विचार प्रत्येकाने केला पाहिजे.
Defeated by abandoning Hindutva stance, former mayor of Chhatrapati Sambhajinagar is angry with Thackeray
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली