विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis काही तांत्रिक कारणाने चेंबूर आणि भक्तीपार्क दरम्यान एक मोनोरेल अडकून 442 प्रवाशांचा जीव टांगणील लागला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकाराच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.Devendra Fadnavis
चेंबूर ते भक्ती मार्ग दरम्यान एक मोनो रेल आज सायंकाळी 6.15 वाजताच्या सुमारास बंद पडली आणि एका बाजूला झुकली होती. सव्वातासाच्या प्रयत्नांनंतर प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. दोन-तीन ठिकाणच्या काचा फोडून या प्रवाशांना मोनो रेलमधून बाहेर काढण्यात आले आहे. वाढलेल्या गर्दीमुळे हा प्रकार घडल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले. मोनोरेल म्हैसूर कॉलनी स्थानकाजवळ अचानक बंद पडल्याने प्रवाशी घाबरले होते. प्रवाशांनी आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 196 या क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर एक दुसरी मोनोरेल मदतीसाठी दाखल झाली. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. त्यानंतर मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तीन स्नोर्केल वाहनांच्या साहाय्याने मदतकार्य सुरु केले होते.Devendra Fadnavis
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत, तीन स्नोर्केल वाहनांच्या मदतीने अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू केले होते. दोन तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाकडून मोनो रेलच्या काचा फोडून आणि दरवाजा कापून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. तीन शिड्यांच्या मदतीने या प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. या सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.
या घटनेची माहिती कळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व यंत्रणाची संपर्क साधला. एक्स या सोसियल मीडिया प्लॅटफॉर्मवर
एमएमआरडीए, अग्निशमन दल आणि महापालिका अशा सर्वच यंत्रणा त्याठिकाणी पोहोचल्या आहेत. सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे कुणीही काळजी करु नये, घाबरून जाऊ नये. सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात येईल. सर्वांनी संयम ठेवावा, ही माझी सर्वांना विनंती आहे. मी एमएमआरडीए आयुक्त, महापालिका आयुक्त, पोलिस आणि सर्वच यंत्रणांशी संपर्कात आहे. हा प्रकार का घडला, याचीही चौकशी करण्यात येईल.
प्रवाशांची सुटका करणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य होते. महानगरपालिका आयुक्त, एमएमआरडीए, बीएमसी, अग्निशमन दल आणि पोलिसांचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. सर्व यंत्रणांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आणि प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. काही प्रवाशांशी मी स्वतः बोललो आहे. सर्व प्रवासी लवकरच त्यांच्या घरी सुरक्षित पोहोचतील.
आज मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे, मी लोकांना आवाहन करतो की गरज नसल्यास घराबाहेर पडू नये. आज सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून, खासगी संस्थांनाही ‘वर्क फ्रॉम होम’ देण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Chief Minister Devendra Fadnavis orders inquiry into monorail case
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला