विशेष प्रतिनिधी
पुणे : काँग्रेस सातत्याने रडका डाव खेळत असते.निवडणूक हरली की, ते ईव्हीएमला दोष देतात. कर्नाटक जिंकलं त्यावेळेस ईव्हीएम छान होतं, अशी टीकाभारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी काँग्रेसवर केली आहे.
दिल्लीतील विजयाबद्दल शिंदे म्हणाले, “आदरणीय विश्व नेते आणि भारत देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा दिल्लीचा तख्त काबीज केला आहे.२७ वर्षांनंतर भाजपचे राजधानी दिल्लीत पुनरागमन झाले आहे.संपूर्ण देशात भारतीय जनता पार्टी आणि एनडीए जिंकत असताना, दिल्लीमध्ये हरत होतो, हे शल्य भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनात होते.”लोकांनी मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे
राहुल गांधी यांच्या आरोपांवर टीका करताना ते म्हणाले, काँग्रेस सातत्याने रडका डाव खेळत असते,” अशी टीका शिंदे यांनी केली. निवडणूक हरली की, ते ईव्हीएमला दोष देतात. कर्नाटक जिंकलं त्यावेळेस EVM छान होतं. कुणावर तरी खापर फोडणे आणि कुणाला तरी बदनाम करणे, ही काँग्रेसची रणनीती आहे. आता यात राहुल गांधींनी उडी घेतली आहे. ईव्हीएमसंपूर्ण जगभरात सुरू आहे. दिल्लीतले निकाल येत आहेत, भाजप जिंकत आहे. थोड्यावेळाने इथे देखील ईव्हीएमला दोष देणे सुरू होईल, बोगस मतदार असते तर आधीच आक्षेप घ्यायचा, निवडणूक हरल्यावर का आक्षेप घेतला? असे शिंदे यांनी सांगितले.
Constant crying, Ram Shinde’s criticism of Congress
महत्वाच्या बातम्या
- अंजली दमानिया यांच्यावर धनंजय मुंडे दाखल करणार फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला
- पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात, दिल्लीत आज मतदान
- Anjali Damania : अंजली दमानिया यांनी वाचला धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचा पाढा, कृषीमंत्री असताना दुपटीहून दराने खरेदी
- Supriya Sule : पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आश्वासन