विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis’ महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान याबाबत सविस्तर निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांना दिले.Devendra Fadnavis’
महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘एनडीआरएफ’मधून भरीव मदत देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. पूरग्रस्तांना ‘एनडीआरएफ’मधून मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारला सविस्तर प्रस्ताव लवकरच पाठवणार आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवेदनात म्हटले आहे.Devendra Fadnavis’
मागील तीन दिवसात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शासन स्तरावर बाधित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा करणार असून बाधित शेतकऱ्यांच्या झालेल्या पीक नुकसानीचा अहवाल शासनास सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्र्यांना अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे मंत्र्यांचे दौरे सुरू आहेत.
Demand for help for disaster-affected farmers; Chief Minister Devendra Fadnavis’s statement to Union Home Minister Amit Shah
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar पुणेकरांनी अडवली शरद पवारांची कार! आमची घरं वाचवा अशी केली मागणी
- भाजप पदाधिकाऱ्यांनी काँग्रसेच्या जेष्ठ पदाधिकार्याला घेरून जबरदस्तीने नेसविली साडी
- Supriya Sule : महाविकास आघाडीत बिघाडी ! सुप्रिया सुळे यांचे स्थानिक स्वराज्य संस्थांत वेगळे लढण्याचे संकेत
- भारतीय प्रेरणांनी लिहिणारे कालजयी साहित्यिक एस एल भैरप्पा यांचे निधन