विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ajit Pawar त्यांचा आहार त्यांना घ्यायला बंदी घालणे हे बरोबर नाही, उचित नाही, असे म्हणत स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी मांसाहारावर बंदी घालण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोध केला.Ajit Pawar
स्वातंत्र्य दिनानिमित्त कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील सर्व लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार आहेत, असे आदेश कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून जारी करण्यात आले. तसेच छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, नागपूर या महापालिकांनी सुद्धा हा आदेश दिला आहे. त्यानुसार 15 ऑगस्टला रात्री 12 पासून 15 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत पर्यंत प्राण्यांची कत्तल करू नये, असे आदेश महापालिकेने दिले आहेत. जनावरांची कत्तल आणि मांसविक्री केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.Ajit Pawar
यावर पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, ज्यावेळेस श्रद्धेचा प्रश्न असतो त्यावेळेस अशा प्रकारची बंदी घातली जाते. आषाढी असेल, महाशिवरात्री असेल, महावीर जयंती असेल, अशा काही महत्त्वाच्या दिवस असतात त्यावेळेस बंदी घातली जाते. आता देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष होत आहेत. आपल्या देशात, राज्यात काही जण शाकाहारी आहेत तर काही मांसाहारी आहेत. आता तुम्ही कोकणात जर गेलात तर साधी भाजी करताना पण तिथे सुकट, बोंबील असलं काही त्यात घालतात. कारण, तो त्यांचा आहार आहे.
अजित पवार म्हणाले, महत्त्वाच्या शहरांमध्ये अनेक जाती-धर्माचे लोक राहतात. भावनिक मुद्दा असेल तर एकवेळ त्या दिवसपूर्ते किंवा काही दिवसांसाठी बंदी असेल तर लोक स्वीकारतात. परंतु, तुम्ही आता महाराष्ट्र दिनाला, 26 जानेवारीला किंवा 15 ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागलात तर उलट अवघडच आहे. ग्रामीण भागामध्ये तर ज्यावेळेस एखादा कार्यक्रम असतो तेव्हा बकरा कापतात आणि साजरा करतात. लोकांच्या भावना देखील महत्त्वाच्या आहेत. परंतु, भावनेचा आणि श्रद्धेचा विषय जेव्हा येईल त्यावेळेस त्या विषयाकडे त्या दृष्टीने बघावे. आदिवासी समाजामध्ये तुम्ही जर बघितले तर त्यांचा मोठ्या प्रमाणातला आहार हा मांसाहारच असतो.
Deputy Chief Minister Ajit Pawar opposes ban on non-vegetarian food on August 15
महत्वाच्या बातम्या
- Amol Mitkari : आपल्या कार्यकर्तृत्त्वाची महती मंत्रालयात जोरदार रंगलीय, अमाेल मिटकरींचा राधाकृष्ण विखे- पाटील यांना धमकीवजा इशारा
- Allahabad High Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव मंजूर
- मनोज जरांगेंची चावी आणि रिमोट शरद पवार यांच्याच हातात, आमदार परिणय फुके यांचा हल्लाबाेल
- cabinet meeting : राज्यात १५ हजार पोलीस भरतीला मंजुरी, मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय