विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray मुंबई ते कोकण जेवढे खड्डे आहेत, तेवढा दंड लावा. हे खड्डे जोपर्यंत बुजवणार नाही तोपर्यंत आम्ही दंड भरणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीसांना सांगा. जनता तुमचा बाप आहे. याच जनतेचा हा पैसा आहे, असे असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला आहे.Uddhav Thackeray
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात आज गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी बैठक घेतली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे म्हणाले, गणेशोत्स्व जल्लोषात साजरा करा. गणपती बाप्पा आपल्याकडे बघतोय हे एक बंधन जरी असले तरी कोणत्याही मर्यादेचे उल्लंघन होणार नाही. आमच्या उत्सवावर बंधनं आणाल तर आम्ही ती तोडून टाकू. डीजे लावायचा नाही असा नियम आला हरकत नाही आम्ही डीजे लावणार नाही. गणपती बाप्पा पाहतोय हे लक्षात ठेवून सण साजरा करा. मंडप बांधायचा कुठे हा प्रश्न आहे. एमआयजी कॉलिनीत टॉवरच्या रुपात राक्षस ऊभे राहिले आहेत. त्यामुळे ऊत्सव साजरे कुठे करायचे हा प्रश्न आहे.Uddhav Thackeray
चोरून आलेली सत्ता आपल्याला काय न्याय देणार. अडचण आली तर शिवसेना डगमगणार नाही. गणोशोत्सवाची परंपरा यापुढेही सुरूच राहील. मध्ये येणारे जाणारे असतात, हे नाते असेच कायम ठेऊया, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना केले. विशेष म्हणजे मुंबई महापालिका आपली होती. भविष्यातही आपलीच असणार, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.
मराठी हिंदी वादावर ठाकरे म्हणाले, हिंदीची सक्ती होऊ देणार नाही म्हणून आम्ही आंदोलन केले. हा निर्णय नंतर मागे घेतला गेला आणि एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव हे आहेत. ते अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांचा भाषेशी काहीही संबंध नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
We will not pay the fine until the potholes from Mumbai to Konkan are filled, Uddhav Thackeray’s attack at the Ganesh Mandal meeting
महत्वाच्या बातम्या
- Amol Mitkari : आपल्या कार्यकर्तृत्त्वाची महती मंत्रालयात जोरदार रंगलीय, अमाेल मिटकरींचा राधाकृष्ण विखे- पाटील यांना धमकीवजा इशारा
- Allahabad High Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव मंजूर
- मनोज जरांगेंची चावी आणि रिमोट शरद पवार यांच्याच हातात, आमदार परिणय फुके यांचा हल्लाबाेल
- cabinet meeting : राज्यात १५ हजार पोलीस भरतीला मंजुरी, मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय