विशेष प्रतिनिधि
मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जरांगे येत्या 29 ऑगस्टला मुंबईत मराठा आरक्षणासंदर्भात मोर्चा घेऊन धडकणार आहेत. मात्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेमुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. Devendra Fadnavis
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. त्यांनी अत्यंत आक्रमकतेने फडणवीसांवर टीका केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मराठा आरक्षणाचं काम देवेंद्र फडणवीस यांनी करु दिलं नाही असा आरोप त्यांनी केला आहे. मात्र जरांगे यांनी अत्यंत खालच्या भाषेत टीका केल्याचा, तसेच फडणवीसांच्या आई बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप भाजपाकडून केला जात आहे.
यानंतर अनेक भाजप नेते फडणवीसांच्या समर्थनात समोर देखील आले व जरांगे यांना ठोस असे प्रत्युत्तर दिले. ज्यात चित्रा वाघ, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर व नितेश राणे यांसारख्या नेत्यांचा समावेश आहे. या सगळ्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांनी मात्र मौन बाळगलं होतं. आता अखेर फडणविसांनी त्यांच मौन सोडत जरांगेंना प्रत्युत्तर दिले आहे. Devendra Fadnavis
फडणविसांनी दिले प्रत्युत्तर
‘जो आपल्याला शिवरायांचा मावळा म्हणवतो तो इतकी खालची भाषा वापरणार नाही. एखाद्या महिलेबाबत इतक्या खालच्या पातळीच वक्तव्य करणार नाहीत,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षणाच काम न करू दिल्याचा देखील आरोप जरांगे यांनी केला होता. त्यावरही फडणविसांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले ‘आमच्यामध्ये कोणीही विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला तरीही आम्ही एक आहोत. माझं आणि शिंदे साहेबांच चांगल आहे. कोणीही काड्या टाकायचा, बांबू टाकायचा प्रयत्न केला, तरी एकनाथ शिंदे आणि माझे चांगले संबंध आहेत.’
‘मी माझे शब्द मग घेतो’: जरांगे
जरांगे यांनी ‘मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईविषयी काहीच बोललो नाही’, असं म्हटलं आहे. मात्र ‘बोलण्याच्या ओघात माझ्या तोंडातून तसा काही शब्द गेला असेल तर तो मी माघारी घेईन’, असं त्यांनी म्हटलं आहे. मराठवाड्यात ही बोलीभाषा असल्याचं देखील जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे. Devendra Fadnavis
दरम्यान मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने आंदोलन घेऊन जायला सज्ज असलेल्या मनोज जरांगेंना रोखण्यासाठी राज्यसरकारचे प्रयत्न चालू आहे. यासाठी आता देवेंद्र फडणवीस यांनी पहिलं ठोस पाऊल उचललं आहे. फडणवीस यांनी थेट त्यांचे स्वीय सहायक राजेंद्र साबळे यांना मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अंतरवली सराटीत पाठविले आहे.
भेटीदरम्यान काय झाले?
याबाबत राजेंद्र साबळे यांनी अंतरवली सराटी येथे जाऊन जरांगे यांच्याशी चर्चा देखील केली. त्यांना गणेशोत्सव असल्यामुळे आंदोलन पुढे ढकलण्याबाबत विनंती केली. मात्र आपण आपल्या निर्णयावर ठाम आहोत व मोर्चा ठरलेल्या दिवशीच मुंबईला येणार असल्याचे जरांगे यांनी म्हणले आहे. Devendra Fadnavis
दरम्यान, आता जरांगे आंदोलनाची तारीख पुढे ढकलणार की गणेशोत्सवादरम्यान मुंबईत आंदोलन घेऊन धडकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
Devendra Fadnavis finally gave a reply to Jarange
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला