विशेष प्रतिनिधी
मुंबई : उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी राष्ट्रीय लाेकशाही आघाडीने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे नाव जाहीर केले आहे. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे मतदार असल्याने महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी त्यांना मतदान करावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले हाेते. यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शरद पवार आणि शिवसेनेचे उध्दव ठाकरे यांना फाेनही केला. मात्र, आमचा इंडिया आघाडीचे उमेदवार रेड्डी यांनाच पाठिंबा असल्याने शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
राऊत म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना मतांसाठी फोन केला. राजनाथ सिंह हे राष्ट्रीय पातळीवर बोलत आहेत. मात्र, आमच्यासारख्या लोकांनी हुकूमशाही विरुद्ध लढण्याची ठाम भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या फोनकडे आम्ही एक शिष्टाचार म्हणून पाहतो.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना पाठिंबा दिल्याचे सांगून राऊत म्हणाले की, विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे संयुक्त उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केला. अर्ज दाखल करताना शरद पवार आणि शिवसेनेतर्फे मी उपस्थित होतो. एक दिवस आधी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात बी. सुदर्शन रेड्डी यांचे स्वागत करणाऱ्या आणि पाठिंबा व्यक्त करणाऱ्या विरोधी पक्षांची बैठक झाली. त्यात मी आणि शरद पवार उपस्थित होतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तुम्ही फोडला. शरद पवारांचा पक्ष फोडला. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी आमदार, खासदार पन्नास-पन्नास कोटीला विकत घेतले. तुम्ही त्याच पक्षाकडे मत मागत आहात, याचे मला आश्चर्य वाटते. आपल्याकडे बहुमत आहे असे आपण म्हणतात तर तुम्हाला अशा प्रकारे मत मागण्याची गरज नाही. तुम्हाला आमच्याकडे मते मागण्याचा काय अधिकार आहे? तुम्हाला भीती वाटते का की तुमचे मते फुटतील. डुप्लिकेट शिवसेनेची मतं फुटतील ही भीती आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केली.
दरम्यान, आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी चाणक्यगिरी शिकवू नये. ते महाराष्ट्राचे मतदार आहेत. मग त्यांनी धोतर नेसून जायला पाहिजे होते. देवेंद्र फडणवीस तुम्ही आम्हाला काही सांगू नये. तुम्ही एखादा मराठी माणूस उमेदवार म्हणून दिला असता तर त्यावर चर्चा झाली होऊ शकली असती. पण आता नाही. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक सहज नाही. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना आणि आम्ही एनडीएमध्ये असताना मराठी भूमिकन्या म्हणून त्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. आंध्र आणि तेलंगणाचे खासदार अशा प्रकारची काही भूमिका घेतील का? अशी भीती या लोकांना वाटत आहे. राहुल गांधी यांनी जे वातावरण देशात निर्माण केलेले आहे. त्यानंतर क्रॉस वोटिंग व्हायची शक्यता आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.
Devendra Fadnavis’ phone call but our support for Reddy, Sanjay Raut clarifies his position
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला