विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis काही लोकं जाणिवपूर्वक मराठा आरक्षण प्रश्न चिघळवण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन समाज एकमेकांपुढे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. ओबीसी व मराठा समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मी काही लोकांची वक्तव्ये पाहिलेत. त्यांचे प्रयत्न काय आहेत हे माझ्या लक्षात येत आहेत. त्यांना मी एवढेच सांगतो की, अशा प्रकारे आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका. तुमचे तोंड भाजेल हे मला त्यांना सांगायचे. शेवटी मुंबई, महाराष्ट्र, आपली सामाजिक विण या सर्व गोष्टी आपल्याला सांभाळायच्या आहेत, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला Devendra Fadnavis,
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणाले, सरकार मराठा समाजाविषयी सकारात्मक आहे. त्यांच्याविषयी आमच्या मनात कोणतीही शंका नाही. पण काही लोक जाणिवपूर्वक हा प्रश्न चिघळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी या आंदोलनावर स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये. कारण, त्यांचे तोंड भाजेल.Devendra Fadnavis,
आज सकाळी आंदोलक मुंबईत आलेत. मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेत. त्यांनीही सर्वांना आपल्याला नियमाने उपोषण करण्याचे व सहकार्याचे आवाहन केले आहे. शासनाचीही भूमिका सहकार्याची आहे. लोकशाही पद्धतीने एखादे आंदोलन होत असेल तर त्या आंदोलनाला आडकाठी आणण्याचे कारण नाही. लोकशाही चर्चेतून प्रश्न सोडवायचे असतात. आंदोलन त्याचा एक मार्ग असतो. त्यामुळे अशा प्रकारच्या आंदोलनाला जे काही सहकार्य लागेल ते सरकार करेल. विशेषतः उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुरुप या प्रकरणी सहकार्य केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, आंदोलकांनी काही तुरळक प्रमाणात वाहतूक व्यवस्था विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी चर्चा केल्यानंतर आंदोलकांनी सहकार्य केले. अर्थात एवढ्या मोठ्या संख्येने लोकं आल्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणे स्वाभाविकच आहे. या सर्व गोष्टींमध्ये एकाच गोष्टीची खबरदारी घ्यावी लागेल. ती म्हणजे काही लोकं वेगळ्या पद्धतीने वागतात आणि त्यामुळे सगळ्या आंदोलनाला गालबोट लागते. अशा प्रकारे कुणीही वागू नये. याच्याकडे लक्ष द्यावे लागेल. मनोज जरांगे यांनीही आपल्या समर्थकांना लोकशाहीबाह्य पद्धतीने आंदोलन न करण्याचे आवाहन केले आहे.
प्रशासनाला या प्रकरणी शासनाच्या नाही तर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार काम करावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनावरही काही बंधने आहेत. या बंधनात राहून लोकशाही पद्धतीने प्रशासन आंदोलकांना योग्य ते सर्व सहकार्य करत आहे. सरकारचेही या प्रकरणी कोणते वेगळे मत नाही, असे सांगून फडणवीस म्हणाले, मराठा आंदोलकांनी पुन्हा परवानगी मागितली आहे. त्यावर कायद्याच्या चौकटीत राहून पोलिस सकारात्मक विचार करतील. हा प्रशासन व आंदोलक यांच्यातील निर्णय आहे. आंदोलकांच्या मागण्यांवर जो काही मार्ग काढता येईल तो काढण्याचा मार्ग आमचा आहे. सरकारने या प्रकरणी एक उपसमिती स्थापन केली आहे. या उपसमितीने यापूर्वीच काही मागण्या मान्य केल्या आहेत. या प्रकरणी केवळ आश्वासन देऊन चालणार नाही. कायदेशीर मार्ग काढावे लागतील. संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील. असे मार्ग कसे काढता येतील? असा आमचा प्रयत्न सुरू आहे.आम्ही समितीला सांगितले आहे की, त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून आमच्याशीही चर्चा करावी. त्यातून एखादा मार्ग काढता येईल. या प्रकरणी दोन समाज एकमेकांपुढे उभे राहतील अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे आपल्याला ओबीसी समाजाला सांभाळावे लागेल आणि मराठा समाजालाही न्याय द्यावा लागेल.
मागील 10 वर्षांमध्ये युती सरकारच्या काळात जेवढा न्याय मराठा समाजाला मिळाला, तेवढा न्याय इतर कोणत्याही सरकारच्या काळात मिळाला नाही. आरक्षण देण्याचे काम आम्ही केले. सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कामही आम्हीच केले आहे., असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आपण एखादा निर्णय घेतो तेव्हा त्याचा दिर्घकालीन परिणाम होतो. त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय सर्वसमावेशकपणे घ्यायचे असतात. एकाला समोर करायचे आणि दुसऱ्याला नाराज करायचे. त्यानंतर त्याला समोर आणायचे, अशा प्रकारचे प्यादे लढवयाचे व लोकांना एकमेकांशी झुंजवणे हे या सरकारचे धोरण नाही. यातून प्रयत्नपूर्वक मार्ग काढू, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
Do not try to exploit the agitation for personal gain, it will backfire, warns CM
महत्वाच्या बातम्या
- किती माजलाय तो जरांग्या, भाषा मग्रुरीची : गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबाेल
- मंत्र्याला काढण्याची घटनेतच तरतूद तर घटना दुरुस्ती कशासाठी, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
- न्यायदेवता अन्याय करणार नाही, मुंबईत जाणारच : मनाेज जरांगेंचा निर्धार
- एकेरी भाषा, आयाबहिणींवर अपशब्द खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाेज जरांगेंना इशारा