विशेष प्रतिनिधी
मुंबई: Prakash Ambedkar गरीब मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या श्रीमंत मराठ्यांना तुम्ही पाठिंबा देत आहात. त्यामुळे गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगेंवर टीका केली आहे.Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करताना म्हटले की, मनोज जरांगे पाटील तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकारविरुद्ध लढत आहात. पण, सरकारमध्ये कोण आहे? आताच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, नारायण राणे सारखे प्रस्थापित मराठा आहेत. तर अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार असताना सत्तेत सर्व प्रस्थापित मराठा होते. जसे की, शरद पवार, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात हे सर्व प्रस्थापित मराठे सत्तेत होते.Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, तुम्ही निवडणुकीत या श्रीमंत मराठ्यांचा प्रचार केला आणि त्यांना मतदान केले. मात्र तुम्ही गरीब मराठ्यांसाठी आंदोलन करत असताना दुसरीकडे आरक्षणापासून त्यांना वंचित ठेवणाऱ्या श्रीमंत मराठ्यांना तुम्ही पाठिंबा देत आहात. असे करून तुम्ही गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका. कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुम्ही श्रीमंत मराठ्यांना पाठिंबा दिला होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तुम्ही पुन्हा तीच भूमिका घ्याल आणि गरीब मराठ्यांना मूर्ख बनवाल का?
Don’t Fool Poor Marathas; Prakash Ambedkar Slams Jarange Over Election Support
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला