Eknath Shinde बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले त्यांना त्याची प्रचिती, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Eknath Shinde बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले त्यांना त्याची प्रचिती, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Eknath Shinde

विशेष प्रतिनिधी

भंडारा : सोन्याचा चम्मच तोंडात घेऊन मी जन्माला आलो नसलो, तरी मी जनतेला सोन्याचे दिवस दाखविले आहे. शिवसेना हा मालक-नोकरांचा पक्ष नाही, तर सच्चा शिवसैनिकांचा व कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कॉमन मॅन बनण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंचेच विचार लागतात. ज्याने बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले त्यांना त्याची प्रचिती आली आहे, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. Eknath Shinde

भंडारा येथे झालेल्या सभेतएक बार कमिटमेंट कर दी, तो मै अपनी आप की भी नही सुनता’ या डॉयलागने सुरुवात करत आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या झालेल्या विजयात कार्यकर्त्यांसह भंडारावासियांचे मोठे योगदान असल्याचे आभार त्यांनी मानले. Eknath Shinde

ते म्हणाले, हा एकनाथ शिंदे सामान्य कार्यकर्ता आहे. हा पक्ष तुमचा आहे, इथे काही कुणी मालक नाही. राजा का बेटा राजा नहीं बनेगा असे श्रीकांत शिंदेही म्हणाले होते. ही शिवसेना हिंदूहृदय सम्राटांची आहे, टोमणे सम्राटांची नाही. मी सीएम असताना म्हणत होतो की, मी कॉमन मॅन आहे. आता मी डीसीएम आहे. म्हणजेच डेडिकेटेड कॉमन मॅन. वाघाचे कातडे पांघरून वाघ होता येत नाही. घरी बसणाऱ्यांना जनतेने घरीच बसवले आहे.



शिंदे म्हणाले की, पवनी- भंडारा हा वाघांचा जिल्हा आहे. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी खरी शिवसेना कोणती यावरून रान उठवले होते. आम्ही जनतेच्या दरबारात जाऊन न्याय मागू अशी पोकळ वल्गना विरोधक करत होते. पण जनताही सुज्ञ आहे, याची जाणीव सुरुवातीपासूनच आम्हाला होती, म्हणूनच भंडारा- पवनी येथील मतदारांनी सच्चा शिवसैनिक भोंडेकर यांना भरघोस मतांनी निवडून देत खरी शिवसेना कोणती याची पावती दिली. वाघाचे कातडे पांघरुण लांडगा कधी वाघ बनू शकत नाही याची प्रचिती आपण भंडारेकरांनी दिली. त्याबद्दल मी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आपले आभार मानायला आला आहे.

राजकारणात आपला मोठा वारसा आहे, असे सांगणाऱ्यांना महाराष्ट्रातील मायबाप जनतेने आरसा दाखविला आहे. अशा मायबाप जनतेला मी भेटायला आलो आहे. कारण मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. अडीच वर्षांपूरवी एक शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला, पण मी कार्यकर्ता म्हणून काम केले. कालही कार्यकर्ता म्हणून काम केले, आजही कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. कारण कार्यकर्ता हा असा व्यक्ती आहे की, तो या व्यासपीठावर बसलेल्यांना नेता, आमदार, खासदार व मंत्री बनवतो. त्यामुळे व्यासपीठ हे वैभव असले तरी कार्यकर्ता हे ऐश्वर्य व संपत्ती आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना जपले पाहिजे असा सल्ला यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.

भगवा म्हणजे एक विचार आहे, भगवा म्हणजे झंझावात, भगवा म्हणजे तलवारीची धार आहे, भगवा म्हणजे जिजाऊचा आशीर्वाद आहे, हे लक्षात ठेवा. विधानसभेत जसा भगवा फडकवला तसाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भगवा फडकवण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले.

Eknath Shinde Slams Uddhav Thackeray

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023