विशेष प्रतिनिधी
मुंबई: महिलांच्या आशीर्वादामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून यश मिळाले. मात्र, काही लोकांचे अजूनही समाधान झालेले नाही. ते तोंडावर पडले, थोबाडावर पडले, मातीत मिळाले तरी सुधारायला तयार नाहीत. रोज मतचोरी, मतचोरी ओरडत आहेत. त्यांच्या डोक्यात थोडी अक्कल येण्यासाठी लाडक्या बहिणींनी त्यांच्यासाठी 25% आशीर्वाद मागावे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधकांना लगावला.
भाजपच्या वतीने आयोजित राखी प्रदान कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मतचोरी झाली असे ते म्हणत आहेत. मात्र, वास्तविक त्यांचे डोकेच चोरी झाले आहे. त्यातले ‘दिमाग’ चोरी झाले आहे. त्यामुळे माझी सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की, त्यांनी 25% आशीर्वाद त्यांच्यासाठी मागावे. त्यामुळे यांच्या डोक्यात थोडी अक्कल येईल. कारण खऱ्या अर्थाने आमच्या लाडक्या बहिणींच्या मताला हे जर चोरी म्हणत असतील, तर यांच्यापेक्षा मोठे चोर दुसरे कोणीच नाही..
मुख्यमंत्री म्हणाले,, निवडणूक संपल्यानंतर योजना बंद होतील, असा दावा हे लोक करत होते. मात्र निवडणूक झाली यांनी सांगितलेले दोन ते चार महिनेही झाले तरी ही योजना सुरु आहे. त्यामुळे ही योजना पाच वर्षे बंद होणार नाही, असा दावा फडणवीस यांनी केला आहे. इतकेच नाही तर पुढील पाच वर्षे महिलांच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार आले तर या योजना कायम सुरू राहतील. मात्र त्या पुढे नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील काळात तुलनात्मक परिवर्तन होणार आहे. त्या नंतर महिलांच्या माध्यमातूनच सरकार चालवले जाईल.
Even though he fell on his face, he is still calling it vote theft, Chief Minister’s attack on Rahul Gandhi
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला