विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानसभेच्या 160 जागा जिंकून देऊ म्हणणाऱ्या दोन व्यक्तींसंबंधी शरद पवारांचा दावा अत्यंत बालिश व हास्यास्पद आहे. त्यांच्यासारख्या नेत्याने असे बाळबोध दावे करणे करणे आश्चर्यकारक आहे, अशी टीका भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
शरद पवार शनिवारी नागपूर येथे बोलताना म्हणाले होते की, विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झाल्या तेव्हा दिल्लीत मला काही लोक भेटायला आले होते. ते दोन जण होते. त्यांची नावे व पत्ते आत्ता माझ्याकडे नाहीत. पण ते म्हणाले होते, महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. आम्ही तुम्हाला 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो.
पण त्यावेळी माझ्या मनात निवडणूक आयोगाच्या विषयी कोणतीही शंका नव्हती. त्यामुळे मी असे लोक भेटतच असतात म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले. हे झाल्यानंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची मी भेट घालून दिली. त्या लोकांनी आपले म्हणणे त्यांनी राहुल गांधी यांच्यापुढे मांडले.
आम्ही या प्रकरणी जनतेच्या दरबारात जाण्याची भूमिका घेऊन दुर्लक्ष केले. पण काल दिल्लीत राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात अतिशय कष्ट करून सफल अभ्यास करून त्याची मांडणी करण्यात आली.
शरद पवार यांच्या या दाव्यावर भाजप आमदार प्रवीण दरेकर म्हणाले, शरद पवारांचे दावे अत्यंत बालिश व हास्यास्पद आहेत. त्यांच्यासारख्या नेत्याने असे बाळबोध दावे करणे आश्चर्यकारक आहे. या प्रकरणी आपण दोन-तीन गोष्टी निश्चितपणे म्हणू शकतो. तुमच्याकडे माणसे आली होती, तर तुम्हाला मॅन्युप्युलेशन करायचे होते का? तुम्ही त्या लोकांना घेऊन राहुल गांधी यांच्याकडे गेला होतात. याचा अर्थ अशा प्रकारच्या गोष्टींना तुम्ही समर्थन देण्याचा विचार केला होता का? हा प्रकार बैल गैला अन् झोपा केला असा आहे. हतबलतेतून अशा गोष्टी पुढे येत आहेत.
शरद पवार कधीच स्पष्ट राजकीय भूमिका घेत नाहीत. त्यांची सध्याची विधाने पाहिली तर त्याची प्रचिती येते. ते दोन्ही बाजूंनी बघ्याची भूमिका घेतात. त्यामुळे आम्ही त्यांच्या भूमिकाकडे गांभीर्याने पाहत नाही, असा टोला शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी लगावला आहे.
Extremely childish, ridiculous, surprising for a leader like Sharad Pawar to make Balbodh claims, says Praveen Darekar
महत्वाच्या बातम्या
- Dnyaneshwari Munde : महादेव मुंडे यांना ओळखत नव्हता तर पोलिसांना का कॉल केले? ज्ञानेश्वरी मुंडे यांचा सवाल
- Uddhav Thackeray हिंदूंना बदनाम करण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचा सवाल
- सच्चे भारतीय असाल तर अशी वक्तव्यं करूच शकत नाही…चीनबाबत आरोपांवरून सुप्रीम कोर्टानेच उपटले राहुल गांधींचे कान
- कोथरूड प्रकरणात पोलिसांवर कारवाई नाही; ती ओबीसी पीडित कोण ? रोहित पवारांचा पुणे पोलिसांना सवाल!