विशेष प्रतिनिधी
नागपूर : बेळगावमध्ये मराठी भाषिकांवर जो अन्याय होतो त्याचा विचार करता हा केंद्रशासित प्रदेश करावा अशी मागणी मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
पाटील म्हणाले, मुंबईने संपूर्ण जगातील आणि देशातील लोकांना आपल्या कुशीमध्ये सामावून घेतले आहे. तिने कोणताही भेदभाव केलेला नाही. पण बेळगावमध्ये मराठी भाषिकांवर जो अन्याय होतो त्याचा विचार केला असता मुंबईने असा कोणत्याही व्यक्तीवर अन्याय केलेला नाही.
तुम्ही एवढं मुंबईच्या बाबत काळजी करत असाल तर बेळगावच्या मराठी माणासावर जो अन्याय केला जातोय त्या विरुद्ध आमच्या सर्वांचीच मागणी आहे की बेळगाव केंद्रशासित प्रदेश झाला पाहिजे काही लोकांचे मुंबईला तोडण्याचे स्वप्न होते. मुंबई महाराष्ट्राची आहे आणि देशाची आर्थिक राजधानी असणार आहे
अलमट्टी तसेच इतर धरणांच्या उंची वाढीबाबत पाटील म्हणाले, कमी उंची असताना सुद्धा सांगली व इतर भागात पुराचा धोका होतो. त्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन उंचीवाढीला स्थगिती द्यावी .