विशेष प्रतिनिधी
मुंबई : Harshvardhan Sapkal राज्यात लवकरच महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकात शहरी भागात प्रभाव रचना व ग्रामीण भागात गट व गण निश्चित केले जातात. प्रभाग, गट व गण निश्चित करताना कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.Harshvardhan Sapkal
ग्रामविकास तसेच नगरविकास विभागाचे मुख्य सचिव यांना पाठवलेल्या पत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे लिहितात की, प्रभाग रचना करताना या संदर्भात दिलेल्या मार्गदर्शक तत्वाचे पुरेपुर पालन होणे अपेक्षित आहे. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निश्चित करताना व त्यांच्या चतुःसीमा ठरवताना नियमामध्ये नमूद असलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे. या कामात कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही व कोणत्याही राजकीय दबावाखाली चुकीचे काम होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा न्यायालयात दाद मागावी लागेल व त्याची संपूर्ण जबाबदारी ही शासनावर राहिल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
Harshvardhan Sapkal demands that political interference should not be allowed while deciding on ward structure, groups and cadres.
महत्वाच्या बातम्या
- Dnyaneshwari Munde : महादेव मुंडे यांना ओळखत नव्हता तर पोलिसांना का कॉल केले? ज्ञानेश्वरी मुंडे यांचा सवाल
- Uddhav Thackeray हिंदूंना बदनाम करण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचा सवाल
- सच्चे भारतीय असाल तर अशी वक्तव्यं करूच शकत नाही…चीनबाबत आरोपांवरून सुप्रीम कोर्टानेच उपटले राहुल गांधींचे कान
- कोथरूड प्रकरणात पोलिसांवर कारवाई नाही; ती ओबीसी पीडित कोण ? रोहित पवारांचा पुणे पोलिसांना सवाल!