विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray मुंबई ते आझाद मैदानात मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करीत असलेल्या मराठा बांधवांना शक्य तितकी मदत करा असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.Uddhav Thackeray
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू आहे. सध्या सरकार त्यांच्या उपोषणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. अशामध्ये अनेक पक्षांचे नेते हे त्यांची भेट घेत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीदेखील मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी दानवे यांनी मनोज जरांगे यांची पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा करून दिली. यानंतर स्वतः मनोज जरांगे यांनी याबाबत माहिती दिली.Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा झाल्यानंतर, इतक्या मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईत आला, हे पाहून उद्धव ठाकरे अचंबित झाल्याचे जरांगे यांनी सांगितले. तसेच सरकारने तुमच्या मागण्यांवर विचार करायला हवा, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केल्याचेही मनोज जरांगे यांनी सांगितले. तसेच, यावेळी उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगे यांच्याकडून आंदोलकांच्या सोयीसुविधांबाबत माहिती घेतली. “गेल्या दोन दिवसांपासून आम्ही बघत आहोत, मुंबईत नाक्या नाक्यावर, चौकाचौकात सगळीकडे मराठेच दिसत आहेत. एका गरिबाच्या पोराच्या शब्दावर मराठा आंदोलकांनी मुंबईत येणे ही मोठी गोष्ट आहे.” असे म्हणत कौतुक केले आहे.
Help Maratha protesters as much as possible: Uddhav Thackeray’s appeal
महत्वाच्या बातम्या
- किती माजलाय तो जरांग्या, भाषा मग्रुरीची : गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबाेल
- मंत्र्याला काढण्याची घटनेतच तरतूद तर घटना दुरुस्ती कशासाठी, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
- न्यायदेवता अन्याय करणार नाही, मुंबईत जाणारच : मनाेज जरांगेंचा निर्धार
- एकेरी भाषा, आयाबहिणींवर अपशब्द खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाेज जरांगेंना इशारा