विशेष प्रतिनिधी
मुंबई : Investment महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी विविध कंपन्यांसोबत जवळपास ३४,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी वेगवेगळ्या क्षेत्रांत १७ सामंजस्य करारांवर (MoU) स्वाक्षरी केली. या गुंतवणुकीमुळे राज्यात सुमारे ३३,००० नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.Investment
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, राज्य सरकारने एकाच दिवसात गुंतवणुकीशी संबंधित १७ महत्त्वाचे करार केले आहेत. या करारांमुळे सुमारे ३४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार असून, यामुळे अंदाजे ३३ हजार तरुणांना नोकऱ्या मिळतील.Investment
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, हे सामंजस्य करार इलेक्ट्रिक बस आणि ट्रक, सोलर मॉड्यूल्स, संरक्षण उत्पादन आणि जीसीसी (GCC) सारख्या क्षेत्रातील विश्वासार्ह कंपन्यांसोबत करण्यात आले आहेत.यापैकी पाच करार उत्तर महाराष्ट्राशी संबंधित असून, त्यांची एकूण किंमत सुमारे ९,८६६ कोटी रुपये आहे. यात नाशिक, अहमदनगर आणि नंदुरबार जिल्ह्यांत गुंतवणूक होईल.पुणे विभागासाठी पाच करार झाले असून, त्यातून ११,९६६ कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे.
विदर्भ विभागासाठी सहा करार करण्यात आले असून, त्यांची एकूण किंमत ११,६४२ कोटी रुपये आहे. गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूरसारख्या जिल्ह्यांना याचा मोठा फायदा मिळेल.याशिवाय, रायगड जिल्ह्यात जवळपास ३,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर तरुणांना रोजगार मिळेल.
Investment of Rs 34,000 crores, creation of 33,000 new jobs in a single day
महत्वाच्या बातम्या
- किती माजलाय तो जरांग्या, भाषा मग्रुरीची : गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबाेल
- मंत्र्याला काढण्याची घटनेतच तरतूद तर घटना दुरुस्ती कशासाठी, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
- न्यायदेवता अन्याय करणार नाही, मुंबईत जाणारच : मनाेज जरांगेंचा निर्धार
- एकेरी भाषा, आयाबहिणींवर अपशब्द खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाेज जरांगेंना इशारा